शेकडो युवकांचा यंग चांदा ब्रिगेडमध्ये प्रवेश, वार्ड अध्यक्षांच्या नियुक्त्या

0
31

चंद्रपूर : यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शहरातील शेकाडो युवकांनी काल यंग चांदा ब्रिगेडमध्ये प्रवेश केला.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेडचा दुप्पटा टाकून युवकांचे यंग चांदा ब्रिगेडमध्ये स्वागत केले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक कलाकार मल्लारप, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष सलीम शेख, घुग्घूस शहर संघटक विलास वनकर, राशिद हुशैन, करणसिंह बैस, यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांची उपस्थिती होती.

यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून विविध क्षेत्रात सामाजिक कार्य केल्या जात आहे. सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून गरजूंपर्यत पोहचण्याचे काम केल्या जात आहे. कोरोना काळात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने राबविण्यात आलेले उपक्रम लक्षणीय ठरलेत. दरम्यान काल सोमवारी शहरातील विविध प्रभागातील युवकांनी शेकडोच्या संख्येने यंग चांदा ब्रिगेडमध्ये प्रवेश केला. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रवेश करणा-या युवकांमध्ये प्रामुखतेने राष्ट्रवादी नगर, पंचशील चौक, रयतवारी, लालपेठ, नेहरु नगर, समाधी वार्ड, बाबूपेठ, भिवापूर, महाकाली मंदिर या वार्डांसह इतर वार्डातील युवकांचा समावेश आहे. या सर्व नव्या सदस्यांच्या गळ्यात यंग चांदा ब्रिगेडचा दुप्पटा टाकून आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांचे संस्थेत स्वागत केले. यावेळी वार्ड अध्यक्षांच्या नियुक्ताही करण्यात आल्यात. यामध्ये तिरुपती कलगुरवार यांना रयतवारी वार्ड अध्यक्ष, दिनेश इंगळे यांना राष्ट्रवादी नगर वार्ड अध्यक्ष, रवि करमळकर यांना  पंचशील चौक वार्ड अध्यक्ष, राम जंगम यांना लालपेठ वार्ड अध्यक्ष, दिनेश बोढाले यांना नेहरु नगर वार्ड अध्यक्ष, भुषण पोतीवाल यांना समाधी वार्ड वार्ड अध्यक्ष, क्रीष्णा कामपेल्ली यांना लालपेठ ३ नंबर वार्ड अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. यंग चांदा ब्रिगेड ही सामाजिक संस्था असून समाजकार्यात युवकांचे सहकार्य असले पाहिजे. संस्थेचे ध्येय, धोरण आणि संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमाचा लाभ शेवटच्या गरजू पर्यंत पोहचविण्याचे काम सामाजिक क्षेत्राची आवळ असल्याने यंग चांदा ब्रिगेडशी जुळलेल्या नव्या सदस्यांच्या माध्यमातून झाले पाहिजे असे आवाहण यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

 

Twitter
WhatsApp
Telegram
Pinterest
ReddIt
Email
Linkedin
Previous articleभाजपा जिल्हाध्यक्ष यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदात्यांचा सत्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here