BREAKING : चंद्रपूरचे आमदार जोरगेवार यांनी स्वतः पकडल्या दारू ने भरलेल्या 7 गाड्या

0
10

एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

चंद्रपूर : जिल्ह्यातील दारूबंदी ही केवळ कागदापूर्तीच मर्यादित असून आजही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा व्यवसाय सर्रासपणे सुरू आहे, मात्र या अवैध दारूवर नियंत्रण मिळविण्यास पोलीस प्रशासन अपयशी ठरले आहे.

पोलीस आपले कर्तव्य बजावणार नाही तर सामान्य माणूस काय करणार असा प्रश्न नेहमी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर उपस्थित होतो.
काही महिन्यांपूर्वी चंद्रपूर विधानसभेचे आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना सूचना केल्या होत्या की अवैध दारूची वाहतूक थांबवा माझ्या क्षेत्रात असे धंदे चालणार नाही, त्यानंतर आमदार जोरगेवार यांना अवैध दारू विक्रेत्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या मात्र 19 जानेवारीच्या रात्री त्यांनी चंद्रपुरात येणारी अवैध दारू पकडून पोलीस प्रशासनाचा निष्काळजीपणा उघडकीस आला.

नागपूर मार्गे शहरात 1 नाही 2 नाही तर तब्बल 7 चारचाकी वाहनांचा ताफा दाखल होत होता, मात्र आमदार किशोर जोरगेवार यांनी जीवाची पर्वा न करीत अवैध दारू विक्रेत्यांच्या वाहनांवर हल्लाबोल केला व 7 वाहन जप्त करीत पडोली पोलीस स्टेशनमध्ये जमा केले. 7 वाहनांमध्ये 1 वाहन हे पायलट गाडी होती, त्याच काम शहरात जाण्याचा मार्ग सुरळीत करून सावधान करणे होते.  6 वाहनात एकूण 1700 ते 2 हजार पेटी दारूचा माल व चारचाकी वाहने एकूण 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

यावेळी पडोली पोलीस स्टेशनमध्ये आमदार जोरगेवार व त्यांच्या समर्थकांशिवाय चंद्रपूर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे सुद्धा उपस्थित होते.
सक्रिय जनप्रतिनिधी म्हणून आमदार जोरगेवार यांनी आपली भूमिका दाखवीत अवैध दारूचा व्यवसाय करणाऱ्याला इशारा दिला की माझ्या क्षेत्रात अवैध दारूचे धंदे चालणार नाही म्हणजे नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here