चंद्रपूर : काँग्रेस पक्षाचे विचार प्रभावीपणे समाज माध्यमातून मांडणारे वरोरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष विलास टिपले यांची चंद्रपूर सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. हि निवड अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष रोहन गुप्ता यांच्या आदेशाने तसेच महाराष्ट्र प्रदेश कमिटी काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने निवड करण्यात आली.
त्यासोबतच वरोरा विधानसभा सोशल मीडिया अध्यक्ष म्हणून चेतना शेटे, चंद्रपूर विधानसभा सोशल मीडिया अध्यक्ष म्हणून पवन नगरकर, राजुरा विधानसभा सोशल मीडिया अध्यक्ष म्हणून विक्रम येरणे, बल्लारपूर विधानसभा सोशल मीडिया अध्यक्ष म्हणून परिष महाजनकर, ब्रम्हपुरी विधानसभा सोशल मीडिया अध्यक्ष म्हणून सुरज बनसोड तर चिमूर विधानसभा सोशल मीडिया अध्यक्ष म्हणून श्रीकांत झिल्लारे यांची निवड करण्यात आली आहे.
सध्या सर्वत्र सोशल मीडियावर विरोधकांकरून मोठ्या प्रमाणात चुकीच्या खोट्या बातम्या व माहिती प्रसारित करण्यात येते. मोठ्या प्रमाणात चुकीच्या अपप्रचार होत असल्याचे चित्र आहे. त्यामध्ये काँग्रेस पक्षाचे विचार व भूमिका प्रभावीपणे मांडण्याकरिता व सोशल मीडियात काँग्रेस कार्यकर्त्याची प्रभावी कामगिरी करण्याकरिता यांची निवड करण्यात आली आहे.
या सर्वाना त्यांच्या निवडी बद्दल खासदार बाळू धानोरकर, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार सुभाष धोटे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहे.