मकरसंक्रातीच्या दिवशी भानारकर कुटूंबावर दुःखद घटना
चिमूर (चंद्रपूर) : शहरातील मासळ मार्गावर वाल्मिक चौक येथे आज दिनांक १४ जानेवारीला दुपारी १ ते २ वाजता दरम्यान घरासमोर खेळत असलेल्या धीरज शंकर भानारकर वय ३ वर्ष यास चारचाकी वाहन एम एच ३४ एम ९३५५ या फोर्ड एकोस्पोर्ट चारचाकी कारने धडक देऊन हा मुलगा गाडी खाली येऊन अपघातात मृत्यू झाला आहे मकरसंक्रातीच्या दिवशी भानारकर कुटूंबावर दुःखद घटना घडल्याने दुःखाचे डोंगर कोसळले आहे . चिमूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असता डाँकट्टरांनी मृत घोषित केले पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे