ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील कामगारांना मतदानासाठी पगारी सुट्टी, आठवडी बाजार अन्य दिवशी

0
166

चंद्रपूर : राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील 604 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी मतदान व 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे.

ज्या ग्रामपंचायतीचे मतदार क्षेत्रात निवडणूक होत आहेत, त्या क्षेत्रातील सर्व दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना यामधील कामगारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी दि. 15 जानेवारी 2021 या मतदानाच्या दिवशी पगारी सुटी जाहीर करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहेत. निवडणुका नसलेल्या भागातील दुकाने, कंपन्या इ. वाणिज्यीक आस्थापना बंद ठेवण्याची आवश्यकता नसल्याचेही आदेशात पुढे म्हटले आहे.

त्याचप्रमणे जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणुका होत आहेत त्या क्षेत्रात दिनांक 15 जानेवारी रोजी भरणारे आठवडी बाजार पुढे ढकलण्यात येत असून ते अन्य दिवशी भरविण्यात यावे, असेही आदेश जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी दिले आहेत.
आदेशाचे पालन न केल्यास संबंधीत आस्थापनांविरूद्ध आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आदेशात नमुद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here