रात्री प्रवेश सकाळी “तो मी नव्हेच’ कांग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्षाच्या कट्टर कार्यकर्त्यांचा प्रताप

0
74

गणेश उईके यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला : मयूर राईकवार

घुग्घूस : दीर्घ प्रतिक्षे नंतर अखेर घुग्घुस नगरपरिषद मंजूर झाली आणि नेत्यांचे तळ्यात – मळ्यात शुरू झाले आहेत.

ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांचे कट्टर समर्थक व जिल्हा कार्यकारणी सदस्य व माजी ग्रामपंचायत समिती सदस्य गणेश उईके व अमित बोरकर यांनी शनिवारी 16 जानेवारी रोजी घुग्घुस येथील स्वागत लान येथे आम आदमी पार्टीच्या जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश घेतला आहे.
ही माहिती सुनील मुसळे यांनी आपल्या फेसबुक वॉलवर दोन दिवसांपूर्वी स्वतः टाकलेली आहे

याची माहिती मिळताच न्युज पोस्ट मध्ये सदर बातमी प्रकाशीत झाल्यानंतर ‘ आम आदमी पार्टीने गणेश उइके यांचा प्रवेश घेतला नसून फक्त सत्कार केला अश्या स्वरूपाची बातमी एका ठिकाणी हेतुपूर्वक प्रकाशित करण्यात आली.

यासंदर्भात न्यूज पोस्टने मयूर राईकवार माजी जिल्हाध्यक्ष यांच्याशी माहिती घेतली असता त्यांनी गणेश उईके यांनी अधिकृतपणे आम आदमी पक्षात प्रवेश केलेला आहे असे स्पष्ट केले आहे.

आम आदमी पार्टी कशाला काँग्रेस नेत्यांचा हार – तुरे देऊन स्वागत करेल असा उलट प्रश्न ही त्यांनी केला.
रात्री प्रवेश करायचा सकाळी तो मी नव्हेच अशी भूमिका घ्यायची, याचीच घुग्घुस येथे सर्वत्र चर्चा होत आहे.

तर दुसरीकडे गणेश उईके यांचा सत्कार केला या बातमीमुळे आम आदमी पक्षाची गोची झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here