मरणाहून प्यारा ‘बर्थ ङे” हमारा

0
582

कोरोनातही नेत्यांना वाढदिवसाची गोङी

घुग्घूस (चंद्रपूर ) : जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग अत्यंत वेगाने पसरत आहे.
आजघडीला जिल्ह्यात 7816 इतके संक्रमित रुग्ण असून 114 बाधीतांचा या जीवघेण्या आजाराने दुःखदरीत्या मृत्यू झाला आहे.

असून चंद्रपूर येथील अर्ध्यापेक्षा जास्त खाजगी रुग्णालया बंद असून शासकीय कोविड रुग्णालयाची अवस्था अत्यंत बिकट आहे.
घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यासह अर्ध्यापेक्षा जास्त कर्मचारी कोरोना संक्रमित झालेले आहे. तर 142 नागरिक संक्रमित असून ऐकून 32 कंटेन्मेंट झोन आहे.
असे असतानाही अनेक राजकीय नेते आपला वाढदिवस साजरा करण्यात धन्यता मानत आहेत.

घुग्घुस येथे कोरोना अत्यंत वेगाने पसरत आहे. मात्र असे असतांना येथील एका राजकिय पक्षांच्या जिल्हास्तरीय नेत्यांसह शहरातील सर्व लहान मोठे नेते हे सुरुवाती पासूनच कधी 31 केकयुक्त धडाकेबाज वाढदिवस तर कधी जन – धन खाते, वीजबिल आंदोलन,पोलिसांना सुरक्षाकीट वाटप या – ना त्या कारणाने सामाजिक अंतर, संचारबंदी, मास्क आदी शासकीय नियमांचा फज्जा उडवीण्यात धन्यता मानली सर्व सामान्य नागरिकांसह नेत्यांच्या कुटुंबातील लोकांना ही संक्रमण झाले.
चंद्रपूर आमदार, बल्लारपूर आमदार, बल्लारपूर नगराध्यक्ष, राजुरा नगराध्यक्ष, यासह अनेक नेते मंडळी ही संक्रमित झाले तर प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ मनोहर आनंदे यांच्यसह अनेक नामवंत लोकांचा या विषाणूमूळे जीव गमवावा लागला आहे. मात्र असे असतांना देखील नागरिकांच्या जीवनाशी काही घेणे – देणे नसलेल्या नेत्यांनी दिनांक 20 संप्टेंबर रोजी सामाजिक अंतराचा कुठलाच नियम न पाळता मोठ्या संख्येने WCL कॉलोनी परिसरातील मुन्नूरकापू समाज भवन येथे एका कार्यकर्त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला व परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here