मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समृद्धी महामार्गावर पाहणी दौरा सुरू झाला आहे. यावेळी त्यांच्यासोबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री यशोमती ठाकूर, वन मंत्री संजय राठोड उपस्थित आहेत. समृद्धी महामार्ग महत्वाचा प्रकल्प असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा (एमएसआरडीसी) कडून हा प्रकल्प राबविला जात आहे.
नागपूर : बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या महामार्गाचे काम चांगल्या पद्धतीने सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. चांगल्या दर्जाचं काम होत आहे. कोरोना काळातही समृद्धी महारार्गाचं काम सुरु होतं. येत्या 1 मे 2021 पर्यंत नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गावरील प्रवास सुरु होईल असे त्यांनी जाहीर केले तर मे 2022 पर्यंत मुंबईपर्यंत महामार्ग सुरु होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्यासोबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री यशोमती ठाकूर, वन मंत्री संजय राठोड उपस्थित होते. समृद्धी महामार्ग महत्वाचा प्रकल्प असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा (एमएसआरडीसी) कडून हा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते नागपूर हे 700 किमीचे अंतर काही तासात सहज पार करता येणार आहे. हा प्रकल्प राज्य सरकारसाठी महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.