ओबीसींची जनगणना केंद्र करीत नसेल तर राज्याने करावी : डॉ. अशोक जिवतोडे
ओबीसी, व्ही.जे.एन.टी., एसबीसी, बलुतेदार अलुतेदारांचा औरंगाबाद येथे एल्गार
चंद्रपुर : मराठा समाजाचा समावेश ओबीसीत नको असा एल्गार करीत जाती पातीत विभागू नका, ओबीसी म्हणून एकत्र व्हा असे आवाहन ना. विजय वडेट्टीवार यांनी औरंगाबाद येथे केले. ओबीसी, व्ही.जे.एन.टी., एसबीसी, बलुतेदार अलुतेदारांचे संघटन असलेला ओबीसी जनमोर्चा अंतर्गत ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाकरीता मराठवाडा विभागीय कार्यकर्ता परीषद आज (दि.5) ला छत्रपती मंगल कार्यालय, औरंगाबाद येथे संपन्न झाली.
या परीषदेचे मार्गदर्शक राज्याचे ओबीसी कल्याण मंत्री ना. विजय वडेट्टीवार व अध्यक्ष माजी आमदार प्रकाश (आण्णा) शेंडगे होते. या परीषदेला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, राष्ट्रीय महासचिव सचिन राजुरकर, वादाफळे, बालाजी शिंदे, जे.डी. तांडेल, चंद्रकांत बावकर, साधनाताई राठोड, डॉ. बी.डी. चव्हाण, आदी उपस्थित होते.
परीषदेचे आयोजक बाळासाहेब सानप व निमंत्रक प्रकाश राठोड होते. यावेळी राज्यातील ओबीसी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशभरातील ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणनेकरीता जोरदार मागणी असतांना देखील केंद्र या मागणीकडे दुर्लक्ष करीत असेल व ओबीसींची जनगणना केंद्र करीत नसेल तर राज्याने करावी अशी मागणी डॉ. अशोक जिवतोडे यांनी या परीषदेत केली.