चंद्रपुर : एप्रिल ते डिसेबंर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी आयोगाकडून 20 नोव्हेंबर 2020 रोजी मतदार यादीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमानुसार 01 डिसेंबर 2020 रोजी राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये (मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हे वगळून) एकूण 14234 ग्रामपंचायतींसाठी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तसेच अंतिम मतदार यादी प्रसिध्द 10 डिसेंबरला प्रसिध्द झाली असून या ग्रामपंचायतीच्या निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. 15 जानेवारी 2021 रोजी या सर्व ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार असल्याचे राज्य निवडणुक आयोगाने आज ( दि. 11 ) काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.सोबतच निवडणुकीचा आचारसहिंता लागू झाल्याचेही म्हटले आहे. 23 ते 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 4 जानेवारीला निवडणुक चिन्ह वाटप व उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करणे. 15 जानेवारीला मतदान आणि 18 जानेवारीला मतमजोणी होणार असून 21 जानेवारीला अधिसुचना प्रकाशित होणार आहे.
निवडणुकीचे जाहीर झालेले पत्र: https://drive.google.com/file/d/1-VVfzbaNYR85x7o1l2Lhkp9JwLdxu1Fp/view?usp=drivesdk