राजकारन : घुग्घुस नप चे विरोधक आता कशाला बनले समर्थक

0
53

◆ सत्तेत असतांना केला विरोध, पद जाताच करु लागले नगर परिषदची मागणी

◆ भाजपचा अजब प्रकार ठरला चर्चेचा विषय

चंद्रपूर : महाराष्ट्र तसेच जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्राम पंचायतची 15 जानेवारी रोजी निवङणूक जाहीर झाली असून, त्याची आचारसंहिता ही लागू झालेली आहे. मागील 27 वर्षापासून घुग्घुस ग्राम पंचायतीला नगर परिषद करण्यात यावे ही मागणी होत आहे.
आगस्ट महिण्यात जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांनी घुग्घुस नगर परिषदेला हिरवी झेंडी दाखविली व लगेच दोन दिवसात नगर परिषदेची उदघोषणा ही शासकीय स्तरावर प्रकाशित झाली. यानंतर भाजपच्या एका नेत्याने नगर परिषद होऊ नये म्हणून खोट्या हरकती दाखल करवून घेतल्याचा प्रकार ही उजेडात आला होता.
विशेष म्हणजे भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन नगर परिषदची तात्काळ मागणी केली आहे.
भाजप अध्यक्ष घुग्घुस सरपंच पदावर होते त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य व स्वतः देवराव भोंगळे जिल्हा परिषद अध्यक्ष असतांना जिल्हा परिषदेत घुग्घुस नगर परिषदचा प्रस्ताव धुडकावण्यात आला होता. त्या आधी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी कोणत्या ही हालतीत घुग्घुस नगर परिषद बनवून देणार अशी हमी एक कार्यक्रम दिली होती. सत्तेत राहुन मंत्री पद भोगत असतांना त्यांना देखिल या विषयाचा विसर पडता होता.
गेली पांच वर्षे भाजप सत्तेत असतांना भोंगळे यांना कधीच नगर परिषदची आठवण का आली नाही, हे न समझण्या सारखा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झालेला आहे.
आता विरोधी बाकावर बसून नगर परिषदेची मागणी करणे म्हणजे अजबच प्रकार दिसत आहे.
या संदर्भात काँग्रेस अध्यक्ष राजु रेड्डी यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी महाविकास आघाडी सरकार नगर परिषदेसाठी सकारात्मक असून नगर परिषद निर्मिती योग्य दिशेने सुरू असून ग्राम पंचायत निवळणूकचे वॉर्ड आरक्षण हे नगर परिषद उदघोषणा पूर्वीच घोषित झाले असल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे.
लवकरच नगर परिषद हे शंभर टक्के होणार असल्याचा निर्धार रेड्डी यांनी व्यक्त केला आहे.
तसेच घुग्घुस विकासाला पोषक नगर परिषद रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्याना घुग्घुस जनता जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
Previous articleघुग्घुस ग्रामपंचायत को नगर परिषद स्थापित कर, चुनाव कराए – देवराव भोंगले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here