विवाह समारंभ व अन्‍य सोहळयांसाठी सभागृहांच्‍या क्षमतेच्‍या 50 टक्‍के प्रमाणानुसार परवानगी द्यावी – आ. सुधीर मुनगंटीवार

0
20

मदतकार्य व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांचे सकारात्‍मक कार्यवाहीचे आश्‍वासन

चंद्रपूर : विवाह समारंभ व अन्‍य सोहळयांसाठी सभागृहांच्‍या क्षमतेच्‍या 50 टक्‍के प्रमाणानुसार परवानगी देण्‍यात यावी अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्‍य शासनाकडे केली आहे. यासंदर्भात त्‍यांनी मदतकार्य व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्‍याशी चर्चा केली. किशोरराजे निंबाळकर यांनी यासंदर्भात सकारात्‍मक कार्यवाहीचे आश्‍वासन आ. मुनगंटीवार यांना दिले.

यासंदर्भात चर्चा करताना आ. मुनगंटीवार म्‍हणाले, राज्‍यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन दरम्‍यान मंगल कार्यालये, सभागृह बंद ठेवण्‍यात आली होती. आता राज्‍य जवळ जवळ अनलॉक झाले आहे. हॉटेल्‍स, जीम, मॉल्‍स आदींना परवानगी देण्‍यात आली आहे. लग्‍नकार्यात तसेच अन्‍य सोहळयांसाठी 50 लोकांच्‍या मर्यादेत मंगल कार्यालये व सभागृहांना परवानगी देण्‍यात आली आहे. मात्र केवळ 50 लोकांच्‍याच मर्यादेत परवानगी देण्‍यात आली असल्‍यामुळे नागरिक मंगल कार्यालयांना किंवा सभागृहांना प्राधान्‍य न देता निवासस्‍थानीच कार्यक्रम करण्‍यावर भर देत आहेत. त्‍यामुळे मंगल कार्यालये, सभागृह संचालन करणा-या व्‍यावसायिकांच्‍या आर्थिक अडचणी वाढल्‍या आहेत. हा व्‍यवसाय अडचणीत आला आहे. या व्‍यावसायिकांना दिलासा मिळावा यादृष्‍टीने सभागृहांच्‍या क्षमतेच्‍या 50 टक्‍के प्रमाणानुसार विवाह समारंभ व अन्‍य सोहळयांसाठी परवानगी देण्‍यात यावी, अशी मागणी सदर व्‍यावसायिकांनी केली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यादृष्‍टीने राज्‍य सरकार आवश्‍यक उपाययोजना करीत आहे.

सार्वजनिक ठिकाणी खबरदारीचे उपाय सुध्‍दा योजले जात आहे. या व्‍यवसायासंबंधी सुध्‍दा या नियमांचे पालन करून परवानगी देण्‍याची आवश्‍यकता आहे. या व्‍यवसायावर कॅटरींग, बॅन्‍ड व्‍यावसायिक, इन्‍व्‍हेंट मॅनेजमेंट असे अनेक व्‍यावसायिक घटक अवलंबून आहेत. हजारों गरीब अकुशल कामगार सुध्‍दा या व्‍यवसायावर अवलंबून आहेत. हातावर पोट घेवून जगणारे हे घटक आशावादी नजरेने शासनाकडे बघत आहेत. मात्र शासन यासंदर्भात निर्णय घेण्‍याबाबत दिरंगाई करीत आहे. 20 फुटामागे एक माणूस या पध्‍दतीने परवानगीचे स्‍वरूप असण्‍याची आवश्‍यकता आहे. निर्णय घेताना कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याबाबत शासन खबरदारी घेत आहे ही बाब निश्‍चीतच योग्‍य आहे. शासनाच्‍या या भूमीकेशी मी देखील सहमत आहे. मात्र सदर व्‍यवसायाला वरील प्रमाण्‍उो परवानगी देण्‍याची नितांत आवश्‍यकता आहे. त्‍यामुळे सभागृहांच्‍या 50 टक्‍के प्रमाणानुसार परवानगी देण्‍याआधी बुकींग घेण्‍याची परवानगी संचालकांना दिल्‍यास पुढे होणारी गैरसोय टळेल अशी भूमीका या चर्चेदरम्‍यान आ. मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली. मदतकार्य व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी सदर प्रकरणी सकारात्‍मक कार्यवाहीचे आश्‍वासन आ. मुनगंटीवार यांना दिले आहे.

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
Previous articleचंद्रपूर ते गडचिरोली राष्ट्रिय महामार्गाचे काम तत्काळ सुरु करा – आ. किशोर जोरगेवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here