वीज पडून दोन शेतकरी ठार तर 2 जखमी

चंद्रपूर : मूल तालुक्यातील पावसापासुन संरक्षण मिळावे यासाठी एका झाडाचा आसरा घेणाÚया 2 जणावर विज पडुन ते जागीच ठार झाले तर 2 जण जखमी झाल्याची घटना मूल तालुक्यातील मौजा बोंडाळा येथे दुपारी 2.30 वाजता दरम्यान घडली. विलास केशव नागापूरे वय 50 वर्षे व गयाबाई पोरटे वय 60 वर्षे असे मृत्तकाचे नांव आहे. तर नामदेव पोरटे आणि ताराबाई नागापूरे हे जखमी आहेत.

मूल तालुक्यातील मौजा बोंबाळा येथे गुरूवारी दुपारी 2.30 वाजता दरम्यान मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरूवात झाली, यावेळी विलास नागापूरे, नामदेव पोरटे, गयाबाई पोरटे आणि ताराबाई नागापूरे या शेतकरयांनी शेतावरून घराकडे निघाले, याचवेळी निंबाच्या झाडावर विज पडल्याने विलास केशव नागापूरे वय 50 वर्षे व गयाबाई पोरटे वय 60 वर्षे हे जागीच ठार झाले तर नामदेव पोरटे आणि ताराबाई नागापूरे हे जखमी आहेत.

जखमीना मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान विजेच्या धक्याने विलास नागापूरे यांच्या मालकीच्या 2 बकÚया ठार झाल्या. सदर घटनेमुळे बोडाळा येथे हळहळ व्यक्त केल्या जात आहे.