रेल्वे कर्मचाऱ्याचा अपघात; दोन पाय गमाविले

चंद्रपूर : घुग्घुस येथील रेल्वेचा कर्मचारी राजीव सदाशिव संगोजीवार वय 46 हा जुन्या रेल्वे सायंडींग वर दुपारी 12:45 वाजताच्या दरम्यान रेल्वे रुटाचे काम करीत असताना रेल्वेने आत ओढावून घेतल्याने त्याला आपले दोन पाय गमवावे लागले यात तो गंभीर जखमी झाला.

याची रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती मिळताच रुग्णवाहीका बोलावून त्यास नागपूर येथील रुग्णालयात तातडीने उपचारासाठी भर्ती करण्यात आले. पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे.