चंद्रपूर जिल्ह्यात कोविशिल्ड लसीचा ठणठणाट

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• जिल्ह्यातील 70 केंद्र बंद
• दुस-या डोसची प्रतिक्षा
• कोव्हॅक्सिन लसीकडे नागरिकांनी फिरविली पाठ

चंद्रपूर : कोरोना लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने २५० पेक्षा अधिक केंद्र तयार केले. १८ वर्षांपुढील वयोगटालाही लस दिली जात आहे; पण जिल्ह्याला कोविशिल्ड लसीचा पुरेसा लससाठा उपलब्ध झाला नाही. परिणामी, दुसरा डोस घेणारे प्रतीक्षा करीत आहेत. चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र व जिल्ह्यातील ७० पेक्षा जास्त केंद्र बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली.

कोविशिल्डचा दुसरा डोस घेणाऱ्या ४५ व ६० वर्षांवरील नागरिकांना शहरातील केंद्रांवर भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर्सनी पहिला डोसही पूर्ण केला आहे. लशीचे फायदे लक्षात आल्याने युवक-युवती केंद्रांवर गर्दी करीत आहेत.

कोव्हॅक्सिनबाबत नागरिकांत गैरसमज

चंद्रपूर जिल्ह्यात लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यापासूनच कोविशिल्ड लस उपलब्ध झाली. त्या तुलनेत कोव्हॅक्सिनला विलंब झाला. या दोन्ही लस १०० टक्के गुणकारी व सुरक्षित असल्याचे केंद्र व राज्य शासनाकडून सांगितले जात आहे. आरोग्य यंत्रणाही लोकांमधील गैरसमज दूर करीत आहे; परंतु कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले नाही. अनेकांमध्ये गैरसमज आहेत. त्यामुळे जनजागृतीसाठी प्रशासनाकडून नवीन स्ट्रॅटेजी तयार करण्याची गरज आहे.