लॉयड्स जनसुनावणीत “राजकीय जावयाला घेऊन रंगला’; कलगीतुरा”

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : घुग्घुस येथील लॉयड्स मेटल्स & एनर्जी प्रा.लि. या कंपनीच्या इंडक्शन फरनेस, रोलिंग मिल, सबमर्जड आर्क फरनेस उभारणी करून इनगॉटस व बिलेट्स 5,00,000 टन प्रतिवर्षं टीएमटी व लॉग प्राडक्ट 5,00,000 टन प्रतिवर्षं क्षमतेच्या संयंत्राच्या फेरो अलॉयज 2500 टीपीए उभारणी बाबत कंपनी परिसरात 30 जून रोजी जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती.

यामध्ये सर्वपक्षीय नेते उपस्थित होते यावेळीस काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष रोशन पचारे यांनी कंपनी प्रशासन हे एका राजकीय पक्षाला सतत सोबत घेऊन चालत असल्याबद्दल टीका केली.

त्यांनी कंपनीने आता आपले जावई बदलावे व नवीन जावयाना संधी द्यावी अशी खरमरीत टीका केली मात्र सदर टीका हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष विवेक बोढे यांनी स्वतःवर घेऊन कंपनीत शैक्षणिक पात्रतेवर काम मिळत असतो आम्ही शिक्षण घेतले असून त्या बळावरच आम्हाला काम मिळतो असे स्पष्टीकरण दिले.

वास्तविक पाहता पचारे यांनी कुणाचे ही नाव घेतले नसतांना देखील बोढे यांनी स्पष्टीकरण दिल्याने तथाकथित जावयाला घेऊन सदर नेत्यांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगल्याने उपस्थित नागरिकांचे चांगलेच मनोरंजन झाले.