घुग्घुस शहरातील वाईन बार सज्ज

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

गुलशन वाईनबारच्या संचालकांनी केली विधिवत पूजा

चंद्रपूर जिल्ह्यातील महाराट्र शासनाने दारू बंदी उठविताच घुग्घुस शहरातील वाईन बार, देशी दारू भट्टी व बीअर शॉपी सज्ज झाले आहे. घुग्घुस शहरातील बार मालकांनी आपल्या दुकानाचे दुरुस्तीचे काम करून पूजा पाठकरून सज्ज केले आहे.

आज शनिवारी सकाळी घुग्घुस शहरातील प्रसिद्ध व्यवसायिक गुलशन वाईनबारचे संचालक श्री. सदय्या कारपाका व नागराज कारपाका यांनी आपल्या परिवारासह गुलशन वाईनबार मध्ये विधिवत पूजा केली.
घुग्घुस शहरात 17 वाईनबार 3 देशी दारूच्या भट्टी व 5 बीअर शॉपी जवळपास आहे.

1 एप्रिल 2015 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी करण्यात आली होती. आता दारू बंदी हाताच बार मालकांनी आपले दुकाने दुरुस्ती करून ग्राहकांसाठी सज्ज केले आहे.