गुप्ता वॉशरीज विरोधात 8 जुलैला ठिय्या आंदोलन

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

स्थानिक चालक – मालक यांना कोळसा वाहतुकीचे काम देण्याची मागणी

घुग्घुस : येथील महामीनरल माइनिंग अँड बेनिफिकेशन प्रा.लिमि. घुग्घुस युनिट ही कोल वाशरीज मागील तीन महिन्यांपूर्वी शुरू झाली असून याठिकाणी पाच मोठया ट्रान्सपोर्टरना कोळसा वाहतुकीचे काम देण्यात आले.
या मोठ्या ट्रान्सपोर्टर द्वारे घुग्घुस परिसरातील दीडशे चालक – मालक यांचे शोषण करण्यात येत आहे.

एकीकडे डीजल दर दररोज वाढत असतांना वाहतूक भाड्यात मोठी कपात करून स्थानिकांचा शोषण करीत असल्याने सदर चालक मालक यांनी घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व कामगार नेते सैय्यद अनवर यांना मदद मागितली स्थानिकांच्या हक्कासाठी चालक मालक यांना घेऊन गुप्ता वॉशरीज येथे हल्लाबोल करण्यात आले.

आठ दिवसांत काम देण्याची मागणी करण्यात आली मात्र व्यवस्थापका तर्फे कुठलाच तोडगा न निघाल्याने दिनांक 08 जुलै रोजी दीडशे वाहना सह वॉशरीजच्या मेन गेट समोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असून यात परिसरातील सर्व चालक मालक यांनी सहभागी होण्याचे आवाहन राजूरेड्डी यांनी केले आहे.