बोलेरोच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपुर : भरधाव वेगात चंद्रपूर वरून मूल कडे येत असतांना बोलेरोने दुचाकीला जबर धडक दिल्याने दोघांचा घटनास्थळीच मृत्यु झाल्याची घटना मूल चंद्रपूर मार्गावर मूल पासून ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या डोणी फाट्याजवळ आज सायंकाळी ५ वाजताचे सुमारास घडली. गोंडपिपरी तालुक्यातील लिखीतवाडा येथील विकास प्रभाकर गावळे (४०), सुरेश मादगु कन्नाके (४०) रा. लिखीतवाडा ( गोंडपिपरी) असे मृतांची नावे आहेत.

चंद्रपूर वरून मूल कडे एमएच-१५-एफव्ही-१७२१ क्रमांकाची बोलेरो पिकअप भरधाव वेगात येत होती. दरम्यान होंडा शाईन या दुचाकीने गोंडपिपरी तालुक्यातील लिखीतवाडा येथील विकास प्रभाकर गावळे (४०) आणि सुरेश मादगु कन्नाके (४०) हे मूल वरून पोंभुर्णा मार्गे स्वगावी जात होते. दरम्यान विरूध्द दिशेने येणाऱ्या बोलेरोने जबर धडक दिल्याने अपघातग्रस्त दुचाकीस्वारांचा घटना स्थळीच मृत्यु झाला. अपघाता मध्ये मृत्युमुखी पडलेले दोघेही दुचाकी स्वार दारू पिवुन असल्याची माहिती असुन विरूध्द दिशेने येणाऱ्या बोलेरोला बाजु देतांना अंदाज चुकल्याने सदर अपघात घडला असा अंदाज वर्तविल्या जात आहे. अपघातग्रस्त बोलेरो ही मूल येथील असुन अपघाताचे वेळेस अलीमखाँ अब्दुल्लाखाँ पठाण रा. मूल वार्ड नं. १२ हा बोलेरो चालवित असल्याची माहीती पोलीसांनी दिली असुन बोलेरो चालका विरूध्द गुन्हाची नोंद केली आहे.