भरपावसात गुप्ता वॉशरीज विरोधात काँग्रेसचे ठिय्या आंदोलन

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : घुग्घुस येथील महामिनरल माइनिंग अँड बेनिफिकेशन प्रा.लि. उसगाव गुप्ता कोल वॉशरीजचे घुग्घुस युनिट हे मागील चार महिन्यांपूर्वी शुरू झाले या वॉशरीज तर्फे अवनिश लॉजिस्टिक, बालाजी ट्रान्सपोर्ट,पी.टी.सी ट्रान्सपोर्ट, डी.एन.आर. यांना कोळसा वाहतुकीचे कामे देण्यात आली हे मोठे ट्रान्सपोर्टर स्थानिक सिंगल मोटर मालकांच्या गाड्या आपल्या हाताखाली लावून त्यांना कमी भाडे देऊन त्यांचे आर्थींक व मानसिक शोषण करीत आहे.

गुप्ता वॉशरीज मध्ये घुग्घुस येथील दीडशे चालक – मालकांना सरळ कोळसा वाहतुकीचे काम देण्याच्या मागणी करिता आज घुग्घुस शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजुरेड्डी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे यांच्या नेतृत्वाखाली भरपावसात गुप्ता वॉशरीजच्या मुख्य गेटवर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

घुग्घुस पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल गांगुर्डे यांच्या मध्यस्थीने बैठक घेण्यात आली यामध्ये वॉशरीजचे वरिष्ठ अधिकारी सुयोग बिडलावार हे स्थानिक चालक मालक यांच्या समस्या निकाली काढण्या करिता उद्या 09 जुलै रोजी घुग्घुस पोलीस स्टेशन येथे ठाणेदार राहुल गांगुर्डे यांच्या माध्यमातून काँग्रेस पदाधिकारी व स्थानिक चालक मालक यांची संयुक्त बैठक घेवून तोडगा काढण्याचे आश्वासन वॉशरीज अधिकाऱ्यांनी दिल्याने तात्पुरता आजचा ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले
उद्या होणाऱ्या बैठकीत तोडगा न निघाल्यास अजून तीव्र आंदोलनाचा इशारा काँग्रेस नेत्यांनी दिला याप्रसंगी काँग्रेस अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर,श्रीनिवास गोस्कुला,अजय उपाध्ये,सिनू गुडला, राकेश खोब्रागडे, रियाज शेख, भास्कर कलवल, श्याम आरकीला, रोहित जैस्वाल, अजिंक्य बहादूरे,अंगद बिराम, मोसिम शेख, बबलू खान,शशी वीरा स्वामी,संतोष गुप्ता, विशाल मादर, नुरुल सिद्दिकी,रोशन दंतलवार, कुमार रुद्रारप, बालकिशन कूळसंगे, सुनील पाटील,रंजित राखूडे, व मोठ्या प्रमाणात काँग्रेस पदाधिकारी व स्थानिक चालक मालक उपस्थित होते.