विजया बंडीवार यांची घुग्घुस काँग्रेस महिला अध्यक्षपदी नियुक्ती

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण महिलांचे संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा चित्रा ताई डांगे यांनी पालकमंत्री विजय वड्डेटीवार खासदार बाळु भाऊ धानोरकर,आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या सूचनेनुसार 8 जुलै रोजी घुग्घुस शहर अध्यक्षपदी सौ. विजया अशोक बंडीवार यांची नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.

याप्रसंगी घुग्घुस अध्यक्ष राजुरेड्डी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर, प्रफुल हिकरे, प्रेमानंद जोगी,अशोक बंडीवार, विशाल मादर, नुरुल सिद्दिकी, रोशन दंतलवार, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.