शेगाव येथून दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला, भीषण अपघातात चार तरुण ठार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

शेगाव : येथून वाशिमला परत निघालेल्या चार तरुणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तहसील पांगरीकुटे येथील रहिवासी असलेले हे चार तरुण शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात जाऊन रात्री घरी परतले होते. पण भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये शुभम कुटे, धनंजय नवगरे, विशाल नवगरे, मंगेश नामदेव राऊत यांचा समावेश आहे. ते पांगरीकुटे गावाचे रहिवासी आहेत.

दरम्यान, खामगावकडे जाणाऱ्या रोडवर त्यांची कार क्रमांक एम.एच. बी बी 8262 आणि आयशर ट्रक क्रमांक एम.एच.19 सी वाय 6404 मध्ये जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच बाळापूर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी तरुणाला उपचारासाठी खासगी वाहनातून सर्वोपचार रुग्णालयात पाठविले. जखमी तरूणाला उपचारासाठी अकोला येथे आणत असताना त्याचा मृत्यू झाला. मृतांमध्ये शुभम कुटे, धनंजय नवगरे, विशाल नवगरे, मंगेश नामदेव राऊत यांचा समावेश असून ते पांगरीकुटे गावाचे रहिवासी आहेत.