जिल्ह्यात दारु सुरु झाल्याबद्दल पालकमंत्री वडेट्टीवारांच्या फोटोची पूजा

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : जिल्ह्यातील दारू 6 वर्षांनी पुन्हा सुरू झाली आहे. याचा आनंद एका वायरल व्हिडिओच्या माध्यमातून पुढे आला आहे.दारुबंदी उठविणा-या पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या फोटोची पूजा केली जात असतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालाय. बार मालकाने काउंटरच्या बाजूला दर्शनी भागात फोटो लावून केलेल्या आरतीचा हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे.

चंद्रपुरात दारुबंदी उठविल्यानंतर मद्यपींच्या आनंदाला उधाण आले आहे. आपला आनंद सेलिब्रिट करण्यासाठी चंद्रपूर शहराच्या वेशीवर असलेल्या ग्रीन पार्क बार रेस्टॉरंट मधे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची ही तसबीर लावली गेली आहे. या बार उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी केली वडेट्टीवार यांची साग्रसंगीत पूजा केली गेली. जिल्हाभरातील 750 बार-रेस्टॉरंटच्या माध्यमातून तळीराम बंदी उठल्याचा आनंद घेत आहेत. पहिल्या 3 दिवसात सुमारे 1 कोटींची दारू तळीरामानी रिचविल्याची प्राथमिक माहिती आहे. गेली 6 वर्षे अत्यंत तोट्याची गेल्याची भावना बारमालकाने व्यक्त केली.

वडेट्टीवार यांनी दारुबंदी उठवून मद्य व्यावसायिक आणि बारमालक-त्यावर आधारित रोजगार यांना चालना दिल्याने हे अनंत उपकार विसरणार नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदविली आहे.