पेट्रोल – डीजल महागाई विरोधात घुग्घुस काँग्रेस तर्फे ‘धक्का मारो आंदोलन’

घुग्घुस : बहोत हुई महंगाई की मार अब की बार मोदी सरकार “अच्छे दिन आयेगे ” चे गाजर दाखवून सत्तेत आलेल्या मोदी शासनाने देशाच्या नागरिकाचे जगणेच कठीण केले.

एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कचच्या तेलाची क्रूड ऑईलचे दर दिवसागणिक खालावत असतांना मोद्दी शासनाने पेट्रोल, डीजल, स्वयंपाक गॅस, गोडेतेल यांच्या किमतीत भरमसाठ वाढ करून मोदी सरकार तुपाशी, देशाची जनता उपाशी अशी करून ठेवली नागरिकांच्या खिश्यावर दरोडे टाकणाऱ्या दरोडेखोर केंद्र शासनाचा निषेध करण्या करिता महाराष्ट्र काँग्रेस कमेटी प्रदेशा अध्यक्ष नाना भाऊ पटोले,पालकमंत्री विजय भाऊ वड्डेटीवार, खासदार बाळु भाऊ धानोरकर यांच्या आदेशानुसार ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश भाऊ देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी कामगार नेते सैय्यद अनवर यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल पंपावरून मोटार सायकीलला धक्का मारून चालवत चालवत मोदी शासन मुर्दाबाद, मोदी सरकार हाय – हायचे नारे देऊन मोदी शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी अजय उपाध्ये, शेखर तंगलापल्ली,सिनू गुडला, विशाल मादर, रोशन दंतलवार, नुरूल सिद्दीकी, इर्शाद कुरेशी, राकेश खोब्रागडे, जुबेर शेख, रियाझ खान, बालकिशन कुळसंगे,देव भंडारी, साहिल सैय्यद,शफी शेख,सुनील पाटील,शुभम घोडके,मुस्लिम शेख, नबी शेख, वसीम शेख,अनूग्रह कालेपल्ली, मॉन्टी तेलकर विकी मादर, अंगद बिराम, अमन सिद्दिकी, सुरज तिराणकर, व मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.