वेकोलीच्या वतीने जागतिक ‘महिला दिन’ साजरा

0
168
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

महिलांनी सर्वच क्षेत्रात हिररीने भाग घ्यावा- माजी सभापती नितुताई चौधरी

घुग्घुस : वेकोली घुग्घुस उपक्षेत्राच्या वतीने जागतिक महिला दिन सामुदायिक मनोरंजन केंद्रात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटक कविता पाटील वेकोली उपप्रबंधक कर्मिक, कार्यक्रमाचे अध्यक्ष नितुताई चौधरी माजी जिप सभापती महिला व बालकल्याण प्रमुख पाहुणे म्हणून वेकोली शक्ती ग्रुपच्या माधुरी पाझरे माजी ग्रामपंचायत सदस्य वैशाली ढवस उपस्थित होत्या.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमे समोर द्विप प्रज्वलीत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी मनोगत व्यक्त करताना सौ. नितुताई चौधरी माजी जिप सभापती महिला व बालकल्याण चंद्रपूर म्हणाल्या आज महिलांनी सर्वच क्षेत्रात हिररीने भाग घेतला पाहिजे. समाजातील आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक अश्या विविध क्षेत्रात महिला पुढाकार घेऊन पुरुषाच्या बरोबरीने काम करीत आहे असे त्या म्हणाल्या.

योग व कल्चर ग्रुपच्या महिलांनी यात भाग घेतला. यावेळी नृत्य, गायन, भाषण, वादविवाद स्पर्धा, प्रश्न मंजुषा असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी वेकोलीचे अप्पर कर्मिक प्रबंधक विनोद पाटील यांचे स्वागत करण्यात आले.

वादविवाद स्पर्धेत राजश्री इरपनवार, माधुरी सुटे, पूजा दुर्गम यांनी स्थान प्राप्त केले. प्रश्न मंजुषा माधुरी सुटे, सुकेशनी करमनकर, सुकन्या कोमलवार यांनी जिंकली.
शक्ती ग्रुपच्या माधुरी पाझरे, सविता शहा, स्वाती पाटील व हर्षा सादलवार यांनी उत्कृष्ट महिला कामगार म्हणून प्रमिला कांबळे वेल्डर क्षेत्रीय कार्यशाळा वेकोली, सुषमा खाडे पंप ऑपरेटर वेकोली यांचा सत्कार करण्यात आला.

सर्व स्पर्धकांना स्मृती चिन्ह देऊन नितुताई चौधरी माजी जिप सभापती महिला व बालकल्याण चंद्रपूर यांनी सन्मानित केले. संचालन कीर्ती ठाकूर यांनी केले. तर आयोजन घुग्घुस उपक्षेत्राचे अजय पाटील सचिव स्पोर्ट्स प्रमोशन कमेटी यांनी केले होते.