नागरिकांच्या समस्या सोडविणारा प्रतिनिधी पदाला शोभतो

राजुरा : निवडणुकीत मिळालेले कुठलेही पद हे कायमस्वरूपी नाही. नागरिकांनी विश्वास टाकून तुम्हाला प्रतिनिधी म्हणून पाठविलेले आहे. नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी पदाचा उपयोग करा. अवघ्या पाच महिन्याच्या कालावधीत खामोना व माथरा गावांचा कायापालट करण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी नवनियुक्त सरपंच झाडे यांनी केलेली आहे. नागरिकांच्या समस्या सोडविणारा प्रतिनिधी पदाला शोभतो.असे प्रतिपादन माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केले.

खामोणा येथे केलेले ग्रामपंचायत च्या वतीने नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्यासाठी आरो प्लांट बसविण्यात आला या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी श्री निमकर बोलत होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच हरिदास झाडे, सौ. शारदा तलांडे, उपसरपंच, ग्रा.पं. खामोना, ग्रामपंचायत सदस्य श्री. मारोती चन्ने, सौ.सोनी ठक, सौ.लक्ष्मी लोणारे, सौ.अलका वैद्य यांची उपस्थिती होती.

कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांच्या पुढाकारातून जिल्हा निधी अंतर्गत पाच लाखाचा आरो प्लांट खामोना येथे बसविण्यात आला . ग्रामपंचायत निवडणुकीनंतर नवनियुक्त सरपंच हरिदास झाडे यांच्याकडे स्थानिक महिलांनी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याबाबत निवेदन दिले होते. यानुषंगाने हरिदास झाडे यांनी सभापती सुनील ऊरकुडे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर अवघ्या पाच महिन्यात महिलांच्या मागणीला न्याय देत पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी आरो प्लांटचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे गावातील महिलानी समाधान व्यक्त केले आहे. गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मत सरपंच हरिदास झाडे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती श्री.दिलीप गिरसावळे, अध्यक्ष, ग्राम विकास समिती, श्री.रामदास गिरसावळे माजी सरपंच, प्रतिष्ठित नागरिक श्री.पुंजाराम ठक, श्री.तुळशीराम तलांडे, श्री.वासुदेव लांडे, श्री.बाबुराव चन्ने, श्री.संतोष चन्ने, श्री.श्रावण विधाते, सौ.वनिता विधाते, सौ.शांताबाई जेऊरकर, सौ.सुमन पोटे, सौ.वनिता माणुसमारे, सौ.शैला लोहे, सौ.वृंदा गिरसावळे, सौ.मीराबाई चन्ने, सौ.बिलनबाई गिरसावळे यांची उपस्थिती होती.