RPF च्या कोठडीत आरोपीचा मृत्यू

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• बल्लारपुर आरपीएफ रेल्वे मधिल रेल्वे घटना
• घातपात कि हत्या; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

चंद्रपुर : चोरीच्या आरोपाखाली अटक केलेल्या एका आरोपीचा आरपीएफच्या पोलीस कोठडीत असताना मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज मंगळवारी (13जुलै) ला उघडकीस आली आहे. अनिल गणपत मडावी (वय 29) असे मृत आरोपीचे नाव आहे. कुटुंबियांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

विरुर पोलीस ठाण्या हद्दीत चोरीच्या आरोपाखाली आरोपी अनिल गणपत मडावी याला अटक करण्यात आली होती. काल सोमवार’ला साऊथ आरपीएफ चौकीत आणण्यात आले होते. हाताला दुखापत झाल्याचे कारण देत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रात्री दहा च्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान या आरोपीचा मृत्यू झाला. दिवसभर या घटनेबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली. मात्र, मंगळवार दि.१३ रोजी दुपारनंतर या घटनेची माहिती बाहेर आली. घटनेचं नेमकं कारण काय?याबाबत चर्चेला उधाण आले असून, हा घातपात तर नाही नं असा संशय व्यक्त करीत कुटुंबीयांनी उचस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.