‘लष्कर’ कुटुंबासाठी मंगळवारची ती पहाट ठरली शेवटची

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

 आनंदाचे क्षण बदलले दु:खाश्रूत

चंद्रपूर : शहराला लागूनच दुर्गापूर आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे महाआऔष्णीक विद्यूत केंद्र याच ठिकाणी आहे. अख्या महाराष्ट्रात याच केंद्रामुळे चंद्रपूरची ओळख निर्माण झाली आहे. या केंद्रामुळे दुर्गापूर नेहमी चर्चेत असतो. मात्र आज मंगळवारची पहाट चर्चेत राहिली ती एका मोठ्या दू:खद घटमुळे. दुर्गापुरात लष्कर कुटुंबातील साखर झोपेत असलेल्या सात सदस्यांचा जनरेटमधून गॅस गळतीने गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी आणि दु:खद घटना घडली. एकाच कुटुंबातील सर्वच सदस्यांवर काळाने घाला घातला. या दु:खद घटनेने दुर्गापूरात शोककळा पसरली आहे. आता कुटूंबात दु:ख व्यक्त करणारेही नाहीत. नियतीचा खेळ बघा ज्या घरात आठ दिवसापासून आनंद होतात तो आनंद आता दु:खात बदलले आहेत.

व्यवसायाने कंत्राटदार असलेले रमेश लष्कर यांनी चंद्रपूर शहराला लागून असलेल्या दुर्गापुरात वार्ड क्रमांक 3 मध्ये नव्यानेच घराचे बांधकाम केले होते. दोन वर्षापासून ते आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत या घरात होते. दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर लष्कर कुटुंबात नुकताच २८ जून ला अजय नावाच्या मुलाचा विवाह संपन्न झाल. कोरोना नियमांचे पालन करून पार पडलेल्या विवाह सोहळ्यामुळे सगळीकडे कुटुंबात आनंदी आनंद होता. मुलाचा लग्न झाल्याने आणि कुटूंबात नवीन सदस्य सुन माधुरी च्या रूपाने आल्याने मुलाच्या संसाराची सुरूवात करण्यासाठी अख्खे लष्कर कूटूंब व्यस्त होते. लग्नाच्या चार दिवसानंतर सून माधुरीही आपल्या माहेरी नागपूरला गेली होती आणि काल सोमवारी ती आपल्या सासरी म्हणजे दुर्गापुरात लष्कर कुटुंबीयांमध्ये वापस आली होती.

12 जुलैला काल सोमवारी शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वादळी वारा सुरू होता. त्यामुळे विद्यूत पुरवठा खंडीत झाला. दुर्गापुरातही विद्यूत डीपी बंद पडली. दुर्गापूर वीज पुरवठा ठप्प झाला. सर्वत्र काळोख पसरला. प्रत्येक कुटुंबियांनी आपापल्या परीने प्रकाशाची व्यवस्था केली. दुर्गापुरातील ‘लष्कर’ कुटुंबीयांच्या घरी काळोख पसरल्याने वडील रमेश लष्कर यांनी जनरेटर सूरू केला. आणि घरातील काळोख नाहीसा होत त्या रात्री प्रकाशाची ज्योत पसरली. 45 वर्षीय रमेश लष्कर हे व्यवसायाने कंत्राटदार होते. त्यामुळे त्यांच्या घरात ब-यापैकी सुविधा होत्या. जनरेटर ही त्या पैकी एक. परंतु जो जनरेटर लष्कर परिवारासाठी प्रकाश स्त्रोत ठला तोच अख्खा कुटूंबाचा घात करेल अशी कल्पनाही कुणाला नव्हती. मात्र नियतीने ठरविले होते. मुलाच्या लग्नाचा आनंद त्या परिवारात गगनात मावेनासा होता. हाच आनंद उराशी बाळगून अख्खे कुटूंब झोपी गेलेले. मात्र तो आनंद रात्री दुःखात बदलला.

पहाटेच्या सुमारास अचानक जनरेटर चा स्फोट झाला.
या स्फोटाने जनरेटर मधील विषारी वायूची गळती झाली. साखर झोपेत असलेले सहा ही जण विषारी गॅस गळतीमुळे बेशूध्दच झोपूनच राहिले. या मध्ये लष्कर कुटुंबातील अजय लष्कर (२१), रमेश लष्कर (४५), लखन लष्कर (१०), कृष्णा लष्कर (८), पूजा लष्कर (१४), माधुरी लष्कर (२०) यांचा समावेश आहे.
लष्कर कुटुंब नेहमी सकाळी 6 वाजता उठायचे मात्र मंगळवारी कुटुंबातील कुणीही उठले नाही. बाहेर आले नाही. नेहमी लष्कर कुटुंबाच्या अंगणात चहलपहल राहायची. त्या सकाळी स्मशान शांतता पसरली होती. त्यामुळे शेजाऱ्यांनी दार ठोठावले असता कुणीही दरवाजा उघडला नाही. शंका निर्माण झाली. आणि शंका काही वेळाने घटनेत बदलली. शेजाऱ्यांनी दरवाजा तोडत आत प्रवेश केला असता घरात सर्वत्र धुर पसरला होता. सगळे सदस्य बेशुद्धावस्थेत पडलेले होते. सर्वत्र एकच कल्लोळ सुरू झाला. शेजाऱ्यांनी सर्वाना बाहेर काढले व रुग्णालयात नेले मात्र कुटुंबातील 6 जणांना मृत्यू घोषीत करण्यात आले. दासू रमेश लष्कर(४०) हि महिला जिवंत असल्याने तिला रूग्णालयात भरती करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने नागपूरला हलविण्यात आले. दूपारच्या सुमारास त्या महिलेचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील सातही सदस्य या दुर्दैवी आणि तितक्याच दू:खद घटनेत मृत्युमुखी पडले.

दहा दिवसांपूर्वी या कुटुंबात विवाह झाला होता.
सोमवारी लष्कर कुटुंबांनी नवविवाहित माधुरी लष्कर ला घरी आणले होते. मात्र नियतीला मान्य नव्हते आणि माधूरीलाही या घटनेत प्राण गमवावे लागले. दुर्गापूर येथील वार्ड क्रमांक 3 मधील लष्कर कुटुंबीयांचे ते घर ओस पडलेले आहे. त्या घरात ना चहल आहे, ना आनंदी आनंद. सगळीकडे दुःखाची छाया गडद झाली आहे. त्या घराच्या भिंती दुःखाश्रू ढाळत आहेत. शेजारी आणि नातेवाईक हुंदके हृदयाला पाझर फोडत आहेत. फक्त नी फक्त आता आठवणी आता उरलेल्या आहेत.