वड्डेटीवार की मुनगंटीवार कौन ठरेल घुग्घुस नगरपरिषदेचे शिल्पकार ?

0
108
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

◽संघर्ष घुग्घुस नगरपरिषद मागणीचा

चंद्रपूर @घुग्घुस : चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक शहरात व त्यासोबतच सर्वात प्रदूषित शहरात प्रथम क्रमांक प्राप्त घुग्घुस ग्रामपंचायतला नगरपरिषदेचा दर्जा देण्याच्या मागणीला आता जवळपास 27 वर्ष होत आलेले आहे. यानंतर मागणी करून भद्रावती, गडचांदूर, चिमूर,नागभीड या नगरपरिषद व नगरपंचायत अस्तित्वात ही आल्या आहे.
एवढया प्रदीर्घ कालावधी नंतर घुग्घुस ग्रामपंचायतला नगरपरिषदेचा दर्जा लवकरच देण्यात येणार असल्याचे सूचक वक्तव्य जिल्ह्याचे पालकमंत्री विजय भाऊ वड्डेटीवार यांने केली आहे.
महाराष्ट्रात युतीचे शासन असतांना 01 जून 1999 साली नगरपरिषदेची उदघोषणा करण्यात आली होती.
चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील आमदार असतांना श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या तर्फे घुग्घुस नगरपरिषद झाल्याचे व ते या नगरपरिषदेचा शिल्पकार असल्याचे बॅनर ही लावण्यात आले होते.
मात्र विधानसभेचा क्षेत्र बदलताच 05 वर्ष राज्यात सत्ता असून ही त्यांना घुग्घुस नगरपरिषदेचा विसर पडला.
महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या आदेशानुसार नगरपरिषदेचा लोकसंख्या हा प्रमुख निकष आहे.
व त्यानुसार 25 ते 40 हजार लोकसंख्या घुग्घुस गावाने 1991 मध्येच पूर्ण केलेली आहे.व सन 2011 च्या जनगणनेनुसार 32654 इतकी आहे.
व आजघडीला ती 50 हजारच्या जवळपास आहे.
व वार्षिक उत्पन्न 08 ते 10 कोटीच्या घरात आहे.
नगरपरिषदेच्या लढ्यात घुग्घुस नगरपरिषद स्थापना संघर्ष समीतीचे अध्यक्ष शामराव बोबडे यांनी अथक परिश्रम केले.
आमरण उपोषण, जेल भरो आंदोलन, विरु गिरी, भीक मांगो आंदोलन, स्वाक्षरी मोहीम, सद्बुद्धी यज्ञ, जिल्हापरिषदे समोर धरणा आंदोलन अशे वारंवार लक्षवेधी आंदोलने विविध राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते यांच्यातर्फे करण्यात आले.
मात्र त्यानंतर 2014 ला जिल्हा परिषद स्थायी समितीच्या 16 जानेवरी 2014 रोजी झालेल्या सभेत घुग्घुस ग्रामपंचायत ही मोठी ग्रामपंचायत असून जिल्हापरिषदेच्या उत्पन्नात मोठा योगदान असल्याबाबत घुग्घुसला नगरपरिषद करण्यात येऊ नये असा ठराव पारित केला व त्यानंतर 2017 ला ही जिल्हापरिषदेत घूघुस नगरपरिषदेची मागणी धुडकावण्यात आली होती.
यानंतर संघर्ष समिती तर्फे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका देखील दाखल करण्यात आलेली आहे.
सर्वत्र उदासीनता असतांना योगा – योगाने काँग्रेसचा सहभाग असलेल्या महाविकास आघाडीचे सरकार आले व जिल्ह्यात काँग्रेसचे तडफदार नेते विजय वड्डेटीवार हे पालकमंत्री झाले तर महाराष्ट्र मध्ये काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर हे निवळून आले.
व अपक्ष आमदार किशोर जोरगेवार ही पहिल्यांदा निवळून आल्यामुळे संपूर्ण टीमच बदलली असल्यामुळे घुग्घुस काँग्रेसचे अध्यक्ष राजुरेड्डी हे नव्या जोमाने नगरपरिषदच्या मागणी करिता पालकमंत्री यांचे मागे तगादा घेऊन लागले कधी शामराव बोबडे यांना घेऊन कधी आमदार किशोर जोरगेवार यांना घेऊन तर कधी आपल्या सहकारी मित्र सय्यद अनवर यांच्यासह स्वखर्चाने वारंवार मुंबई मंत्रालयाची चक्कर टाकण्यास सुरुवात केली.
पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांच्यातर्फे ग्रामविकास मंत्र्याकडे बैठक लावली.
व सतत पाठ पुरावा केला यामुळे घुग्घुस नगरपरिषद होण्याचा मार्ग आता सुकर होत असल्याचे चिन्ह दिसत असून कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीतच घुग्घुस नगर परिषदेचा प्रस्ताव पारित करून नगरपरिषदेची निर्मिती करण्यात येईल असा सुतोवाच पालकमंत्री विजय वड्डेटिवार यांनी केल्यामुळे घुग्घुस नगरपरिषदेचे ते शिल्पकार ठरतील असा जनमानसात भावना निर्माण झाली आहे.