माहिती अधिकारातून झाली माहिती उघड
चंद्रपुर : एकीकडे कोरोनाचे संकट हाताळण्यासाठी निधी नसल्याची ओरड करणाऱ्या मनपाने दुसरीकडे निधीची उधळपट्टी सुरू केली आहे. चंद्रपुरात मनपाने महापौरांसाठी गरज नसताना नवे वाहन खरेदी केले. केले तर केले, हा प्रकार इथपर्यंतच थांबला नाही, तर मनपा प्रशासनाने या वाहनावर आरटीओच्या व्हीआयपी क्रमांकासाठी तब्बल 70 हजार रुपये मोजले आहे. नवे वाहन खरेदी करण्यासाठी आणि त्यावर ७० हजार रुपयांच्या व्हीआयपी क्रमांकासाठी निधी कुठून आला, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेने 24 फेब्रुवारी 2021 रोजी एक्सएल एल्फा नेक्सा कंपनीचे वाहन खरेदीसाठी 11 लाख 18 हजार 68 रुपये मंजूर केले. हे वाहन महापौरांसाठी वापरण्यात येणार असल्याने या वाहनाकरिता एचएच 34 बीव्ही 1111 या व्हीआयपी क्रमांकाकरिता 70 हजार रुपये आगाऊ मोजले आहे. वाहनाची मूळ किंमत 10 लाख 41 हजार 131 रुपये इतकी आहे. व्हीआयपी क्रमांकासाठीचे 70 हजार रुपये असे मिळून 11 लाख 18 हजार 168 रुपये मनपाचे मोजले आहे.
ही धक्कादायक माहिती संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी माहितीच्या अधिकारातून उघड केली आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या
 





                                          





                      

