विज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणा
चंद्रपुर : शेतात खत मारण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा जिवंत तारांना शाॅक लागून मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी (15 जुलै) सकाळी एकारा शेतशिवारात घडली. गोविंदा मुरखे (वय 48) असे मृत शेतक-याचे नाव आहे.
ब्रम्हपूरी तालूक्यातील मौजा एकारा येथे आज सकाळी साडेसात वाजताचे सुमारास स्वत:च्या गावालगत असलेल्या शेतामधे भात पिकाला रासायनिक खत टाकण्या करिता गेला होता. कृषि पंपाला विज पूरवठा होणारे दोन खांब मागील आठवडाभरापासून पासून शेतात कोसळले होते. परंतू विज पूरवठा खंडित करण्यात आले नव्हता. आज सकाळी खत मारताना विद्यूत शासक लागून मृत्यू झाला.
विजवितरण कपंनीच्या निष्काळजी पणामूळे एका अपंग शेतकऱ्याला आपला जिव गमवावा लागला. घरातील कर्ता व्यक्ति जाण्याने गावात हळहळ केली जात आहे. त्याच्या पश्चात पत्नि 1 मूलगा 1 मूलगी आहे.
वृत्त लिहीपर्यंत विज वितरण कंपनी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले नव्हते.