मुंबई : राज्यात मोठ्या राजकिय खेळीनंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात आल. मात्र काही महिन्यातच कोरोनाच्या देशभर तांडव झाला. यातच सतत भाजपकडून ठाकरे सरकारवर कोरोना परिस्थिती हाताळण्यात कमी पडत असल्याचा आरोप करण्यात येत होता. याचबरोबर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार तकलादू आहे. हे सरकार आपल्याच ओझ्याने पडेल असा दावा भाजपकडून केला जातोय. अशावेळी महाविकास आघाडी सरकार आणि खासकरुन शिवसेनेसाठी एक महत्वाची बातमी समोर आलीय.
प्रश्नम या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरेंनी लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत नाव पटकावलं आहे. प्रश्नमकडून देशातील 13 राज्ये निवडण्यात आली होती. या संस्थेद्वारे महाराष्ट्र, बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या 13 राज्यांतील जनतेचा कौल जाणून घेतला होता.
यात महाराष्ट्रातील सर्वेक्षण झालेल्या जवळपास निम्म्या मतदारांनी (४९ टक्के) असा विश्वास आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगली कामगिरी केली आहे. आणि ते त्यांना पुन्हा निवडून देतील. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान ४४ टक्के मतांनी दुसर्या क्रमांकावर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आहेत. सर्वेक्षण केलेल्या ४० टक्के मतदारांनी त्यांच्या कामगिरीला मान्यता दिली.