वनाधिकारी सांगून साडेपंधरा लाखांची फसवणूक

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपुर : बल्लारपूर शहरातील लाकूड व्यावसायिकाला वन अधिकारी असल्याचे सांगत तब्बल 15.5 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लाकूड व्यावसायिक लक्ष्मन पटेल यांनी 11 जुलै ला बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दिली. आरोपी 36 वर्षीय सुधाकर जितेंद्र सिंह रा. बेल थरा जि. बलिया याने फिर्यादी पटेल यांना प्रत्यक्ष भेटत आपण साईड बिजनेस म्हणून सागवान चा व्यापार करण्याचा सल्ला दिला.

विशेष म्हणजे आरोपी सुधाकर सिंह यांनी स्वतःला मध्यप्रदेशातील हाउमरिया टायगर प्रोजेक्ट येथे सहायक वन अधिकारी म्हणून नोकरीला आहे असे सांगितले.

पटेल यांनी सिंह यांचेवर विश्वास टाकत व सिंह यांनी सागवान लाकडांची एक खेप आपल्याकडे पाठवितो व ते सागवान आपण बाजारात विकावे असे सांगत पटेल यांचेकडून 15.5 लाख रुपये एडव्हान्स म्हणून घेतले. मात्र आरोपी सिंग यांनी लाकूड पाठविलेच नाही. आपली फसवणूक झाली हे लक्षात येताच पटेल यांनी बल्लारपूर पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी सिंह ला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो वारंवार निवास बदलत असल्याने तो अटकेच्या बाहेर होता.