भ्रष्टाचारी व पदाचा दुरुपयोग करणाऱ्या तहसीलदार होळी यांची विभागीय चौकशी करून निलंबित करा

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यासह विभागीय आयुक्त यांच्याकडे मागणी

चंद्रपूर : मूल तहसीलदार होळी हे रेती घाट व्यावसायिक व अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांकडून लाखों रुपये बेकायदेशीर वसुली करून शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडवित असल्याने त्यांच्या कार्यकाळातील संपूर्ण निर्णयाची, रेती घाट आणि रेती चोरी संदर्भातील काढलेल्या आदेशाची विभागीय चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार व विभागीय आयुक्त यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देऊन केली आहे.

मूल चे तहसीलदार होळी यांचा राजुरा व आता मूल येथील कार्यकाळ अत्यंत वादग्रस्त राहिला असून आपल्या पदाचा दुरुपयोग करून त्यांनी रेती घाट व्यावसायिक व अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांकडून कोट्यावधी रुपये गैरमार्गाचा अवलंब करून मिळविले व शासनाचा महसूल बुडवला आहे. ज्या अवैध रेती वाहतूक व रेती चोरी प्रकरणात शासनाच्या खात्यात दंड रूपाने पैसे जायला हवे तिथे होळी यांनी स्वताच्या खिशात ते पैसे टाकले. त्यामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल त्यांनी बुडविला असल्याचा आरोप पत्रकार परिषद घेऊन राजू कुकडे यांनी लावला आहे.

मूल तालुक्यात जवळपास 18 रेती घाटाचे लिलाव झाले आहे, त्या रेती घाट व्यावसायिकांकडून तहसीलदार होळी हे महिन्याचे 1 लाख रुपये हप्ता घेतात तर रेती घाटात अवैधरित्या जेसीबी मशीन चालवल्या जाते त्या मशीनचे दंड म्हणून तहसीलदार होळी यांनी जवळपास प्रत्तेकी 7 लाख रुपये घेतले असल्याची माहिती आहे. अशातच मौजा चिंचाळा येथील जवळपास 20 ते 22 ट्रक्टर रेती ही स्थानिक तलाठी व मंडळ अधिकारी यांनी तहसीलदार होळी यांच्या आदेशाने जप्त केली ती रेती चोरट्यांनी चोरून नेली पण तहसीलदार होळी यांनी दीड महिना उलटल्यानंतर सुद्धा त्याचा तपास केला नाही व उरलेली रेती ही घरकुल लाभार्थ्यांना दिली असल्याची माहिती तलाठी देत आहे. परंतु घरकुल लाभार्थ्यांना रेती देण्याचा आदेश झाला का? याबाबत काहीही माहिती नाही.rei

चिंचाळा येथील जप्त रेती चोरी गेली व रेती घाटातून रेती उत्खनन करून त्याचा जो रेती साठा जिकडे तिकडे करण्यात आला त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते निखिल वाढई व इतर युवकांनी तहसीलदार होळी यांना निवेदन दिले, मात्र त्याच निवेदनकर्त्याना तहसीलदार यांनी पदाचा दुरुपयोग करून दिनांक 3 तारखेला त्यांच्या कार्यालयातून टायपिंग करून जो नोटीस निखिल वाढई व इतरांना देण्यात आला त्यावर तारीख 28 जून टाकण्यात आली जी तहसील कार्यालयाची निवेदन कर्त्याना फसविण्याची चाल आहे, त्या नोटीसमधे निवेदनकर्त्यावरवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे जे आदेश आहेत ते नियमाला धरून नसून तहसीलदार होळी यांनी पदाचा गैरवापर केलेला आहे. या संदर्भातील बातमी भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल वर प्रकाशित झाली असता त्याबद्दल संपादकांना अगोदर व्हाट्सअपवर व नंतर वकिलामार्फत नोटीस पाठवली आहे, याहून कहर म्हणजे राजुरा येथे ते कार्यरत असतांना पान ठेल्यावर चर्चा करत असलेल्या युवकांना सुद्धा त्यांनी नोटीस पाठवली, रेती घाट परिसरातील काही गावाचे सरपंच. पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य आणि सामान्य नागरिक यांना सुद्धा तहसीलदार दमदाटी करतात व त्यांचे रिकामे ट्रक्टर तहसील कार्यालयात जाम करून दंड आकारातात, तहसीलदार होळी यांच्यावर कुणी टीका केली किंव्हा त्यांच्या कामकाजाच्या संदर्भात बातमी प्रकाशित केली तर तहसीलदार होळी हे आपल्या पदाचा दुरुपयोग करून संबंधितांना नोटीस वाजवून न्यायालयीन दबाव टाकून त्यांच्यात भीती निर्माण करतात हे यावरून शीद्ध होते.

तहसीलदार होळी यांनी आपल्या काही निकटवर्तीय आदिवासींना लोकांना हाताशी धरून जिल्हाधिकारी यांना संपादक राजू कुकडे यांच्यावर अनुसूचित जनजाती कायद्या अंतर्गत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी द्यायला लावली, त्यामुळे आपल्या पदाचा खुलेआम गैरवापर करून व त्या आडोशाने लाखो रुपयाची वसुली रेती व्यवसायी व अवैध रेती तस्करी करणाऱ्याकडून करून शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूलवर स्वतः डल्ला मारणाऱ्या तहसीलदार होळी यांची विभागीय चौकशी करण्यात यावी सोबतच व त्यांचे निलंबन करण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे.