शासकीय विश्रामगृहात पालकमंत्र्यांसमोरच भिडले काँग्रेसचे आजी – माजी शहराध्यक्ष

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : खनिज विकास निधीच्या वाटपाबाबत शासकीय विश्रामगृहावर आयोजित सभेत पालकमंत्र्यांच्यासमोर काँग्रेसचे आजी-माजी शहराध्यक्ष भिडले. हा प्रकार सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडला.

खनिज विकास निधीच्या वाटपाबाबत काँग्रेस नगरसेवकांची विश्रामगृहावर बैठक होती. येत्या काही महिन्यांवर मनपाची निवडणूक होणार आहे. निवडणूक समोर  काँग्रेसच्या नगरसेवकांना निधीचे वितरण करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीत  विद्यमान नगरसेवकांसोबतच माजी नगरसेवकांच्या वॅार्डात निधी देण्याचा मुद्दा आला.

काँग्रेसचे शहराध्यक्ष रामू तिवारी यांनी माजी नगरसेवकांची यादी पालकमंत्र्याकडे सादर केली. त्यावर नागरकर यांनी आक्षेप घेतला. यावर तिवारी यांनीही आक्षेप नेोदविला. या दोघांनीही एकमेकांना धमक्या दिल्या. हा प्रकार  पालकमंत्र्यांच्या उपस्थित सुरू होता.

उपस्थितीत नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी दोघांनाही समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु वाद एवढा विकोपाला गेला होता की कुणीच एोकण्याच्या तयारीत नव्हते. शेवटी पालकमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर रागाने नागरकर आपल्या सहकारी नगरसेवकांसोबत निघून गेले. त्यानंतर तिवारी समर्थकांनी  वडेट्टीवार यांचा सोबत बैठक पुर्ण केली