सुचना, शासकीय विश्रामगृह येथे महावितरणच्या अधिका-यांशी बैठक
चंद्रपूर : विद्युत बिलावरुन कुटुंबा – कुटुंबात होणारे वाद टाळण्यासाठी विभक्त झालेल्या कुटुबांना वेगळी विद्युत जोडणी देत स्वतंत्र मिटर देण्यात यावे अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी महावितरणचे अधिक्षक अभियंता सुनिल देशपांडे यांना केल्या आहे. त्यांनीही हि सुचना मान्य करत गॅस कनेक्शनच्या आधारे सदर कुटुबांना स्वतंत्र मिटर देण्याचे मान्य केले आहे.
जिल्हा नियोजन समीती अर्थात डिपीडीसी अंतर्गत प्रस्तावीत कामांची सध्या स्थितीबाबत माहिती जाणून घेण्यासाठी व महावितरण संदर्भातील विविध तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आज शासकीय विश्रामगृह येथे आमदार किशोर यांनी महावितरणच्या अधिका-यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी सदर सुचना केल्या आहे. या बैठकीला महावितरणचे अधिक्षक अभियंता सुनिल देशपांडे, अधिक्षक अभियंता संध्या चिवंडे, कार्यकारी अभियंता फरास खाणेवाला, वसंत हेडाऊ, अरुण मानकर, साहिल डाखरे, यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या महिला संघटीका वंदना हातगावकर, संघटक कलाकार मल्लारप, युवा नेते अमोल शेंडे, सायली येरणे, आशा देशमूख, राशिद हुसेन, विलास वनकर, मुन्ना जोगी, नकुल वासमवार आदिंची उपस्थिती होती.
एका घरी विद्युत मिटर असल्यामूळे कुटुंबा कुटुंबामध्ये विद्यूत बिलाच्या मुद्यावरुन नेहमी वाद होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी विभक्त कुटुंबाला वेगळी मिटर जोडणी देण्याच्या अनेक मागण्या कार्यालयात प्राप्त झाल्या असल्याचे सदर बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी महावितरणच्या लक्षात आणून देत विभक्त झालेल्या कूटुंबाला वेगळे मिटर देण्याच्या सुचना केल्यात या सूचनेबाबत महावितरणचे अधिक्षक अभियंता सुनिल देशपांडे यांनी सकारात्मकात दाखवत मान्य स्वतंत्र मिटरची मागणी आल्यास सदर ठिकाणची पाहणी करुन गॅस कनेक्शनच्या आधारावर सदर कुटुंबाला स्वतंत्र मिटर उपलब्ध करुन देण्याचे मान्य केले आहे. तसेच भाडेकडुंसाठीही स्वतंत्र मिटर देण्याच्या प्रक्रियेतील जाचक अटी सरळ करुन त्यांनाही स्वंतत्र मिटर देण्याच्या प्रक्रिया सरळ करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी या बैठकीत सांगीतले आहे. रस्त्यामधोमधेत येणारे विद्युत खांब काढण्यात यावे, विद्युत देयक थकीत असलेल्या ग्राहकांचे विद्युत पूरवठा खंडीत करण्या अगोदर त्यांना पूर्व सूचना देत देयक अदा करण्यासाठी तिन टप्पे आखून देण्याच्या सुचना या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे.
काही ठरावीक कामे डी.पी.डी.सी अंतर्गत केली जात असतात मात्र महावितरण कार्यालया मार्फत हे कामे प्रलंबीत ठेवण्यात आली आहे. परिणामी नागरिकांना अडचण निर्माण होत आहे. त्यामूळे हे कामे मार्गी काढण्याच्या सुचना आ. जोरगेवार यांनी केल्या आहे. सेंट मायकल शाळेसमोर असलेली स्ट्रिट लाईट मीटर व फ्यूज डी. पी पी. डब्लू. डी कॉटर जवळ स्थानांतरीत करण्यात यावी, जूने झालेले विद्यूत पोल काढून नविन विद्यूत पोल लावण्यात यावे, राष्ट्रवादी नगर येथे नविन ट्रान्सफार्मर लावण्यात यावे, डि.पी.डी.सी अंतर्गत 3 विद्यूत पोल मंजूर करुन आरवट येथे लावण्यात यावे, रमाबाई नगर, जलनगर वार्ड, पागल बाबा नगर, हिंग्लाज भवानी वार्ड, महाकाली कॉलरी प्रकाश, येथे विद्यूत पोल व पथदिवे लावण्यात यावे, नागरिकांच्या घरावरुन विद्यूत प्रवाहीत तारांचे स्थलांतर करण्यात यावे, गोलबाजार व टिळक मैदान येथील विद्यूत वाहिनी भुमीगत करण्यात यावी, विभक्त झालेल्या कुटूंबाला वेगळे विद्युत मिटर उपलब्ध करुन देण्यात यावे, आवश्यक असलेल्या ठिकाणी विद्युत खांब मंजूर करण्यात यावे आदि कामे डि.पी.डि.सी अंतर्गत तात्काळ मार्गी लावण्याच्या सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी महावितरणच्या अधिका-यांना केल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यूत पूरवठा वांरवार खंडीत होत असतो त्यामूळे यावर योग्य उपाययोजना करण्याच्या सुचना या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी महावितरणला केल्या असून सदर बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात प्राप्त अनेक तक्रारींचे निराकरण करण्यात आले.