घुग्घुस : सहा वर्षांच्या प्रदिर्घ कालावधी नंतर जिल्ह्यातील दारू बंदी उठविण्यात आली. बंद पडलेल्या दारू दुकाने बारचे दालन सर्व – मद्यप्रेमीं साठी उघडण्यात आली यामुळे जिल्ह्यात सर्वत्र मद्यप्रेमींची आनंदाला पारावार उरला नाही तर दुसरीकडे दारू विक्रेते हे नामदार विजय वड्डेटीवारांना देवाचा दर्जा देऊन त्यांच्या फोटो समोर विधिवत पूजा करतांनाचे चित्र देखील पाहायला मिळाले.
काल 19 जुलै रोजी घुग्घुस भेटीला आलेल्या पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांची परिसरातील बार मालकांनी भेट घेऊन पुष्पहार घालून स्वागत करीत आभार व्यक्त केला याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे,अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, आगदारी,नागराज करपाका,रवी चिंतलवार,सचिन पिपळकर, सचिन निमजे,संबाशिव खारकर,सुहास ठेंगणे,स्वामी जंगम,जयंता जोगी,सतीश कोन्द्रा, विठ्ठल पोलशेट्टीवार,व अन्य उपस्थित होते