परमबीर सिंग या दिग्गज भाजप नेत्याचे व्याही, हे त्या पत्रा मागील आरोपांचं कारण नाही ना?

0
330
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि नुकतीच सचिन वाझे प्रकरणावरून उचलबांगडी झालेले परमबीर सिंग यांचे भाजपच्या नेत्यांशी असलेले नाते संबंध देखील समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे पुन्हा अनिल देशमुखांना लक्ष करणाऱ्या भाजपवर अजून टीका सुरु झाली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पत्राद्वारे केलेल्या आरोपामुळे राज्यात आणि देशभरात वृत्त झळकू लागल्याने विरोधक आक्रमक झाले. मात्र आता त्यांचे देखील याच पोलीस अधिकाऱ्यांशी असलेले संबंध हळूहळू उघड होऊ लागले आहेत. त्यामुळे सध्या शिवसेनेबद्दल युती काळातील उजाळा देताना फडणवीसांनी आरोप केला होता की शिवसेनेने मी मुख्यमंत्री असताना सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस खात्यात घेण्यासाठी माझ्याकडे आग्रह केला होता. त्यातून त्यांनी शिवसेनेला लक्ष करताना परमबीर सिंग यांच्या समितीकडे दुर्लक्ष केलं होतं, हे मात्र ते जोर देऊन सांगण्यास यामुळेच विसरले होते का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

गृहमंत्र्यांनी प्रत्येक महिन्याला शंभर कोटींच्या वसुलीचे टार्गेट सचिन वाझे यांना दिले होते, असा धक्कादायक आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. यामुळे भाजप आक्रमक झाली असली तरी परमबीर सिंग यांचे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी असलेले घरातील संबंध उघड होतं आहेत. त्यामुळे परमबीर सिंग यांनी जे पत्र लिहिलं त्यामागे भाजपचे हे घरातील संबंध तर नाहीत ना असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना मोठा मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचा मुलगा रोहन सिंग याचा विवाह भारतीय जनता पक्षाचे विदर्भातील दिग्गज नेते आणि शिक्षण सम्राट दत्ता मेघे यांचे सुपुत्र सागर मेघे यांची कन्या राधिका हिच्याशी झाला आहे. विशेष म्हणजे याची अनेकांना माहिती नाही. काँग्रेसमध्ये ३६ वर्षे राहिल्यानंतर दत्ता मेघे यांच्या कुटुंबाने २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला होता. दत्ता माघे हे विदर्भातील दिग्गज नेते असल्याने त्यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील घनिष्ठ संबंध असल्याचं समजतं. वडील दत्ता मेघे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सागर यांनी रिक्त झालेल्या वर्धा जिल्ह्यातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. परंतु, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दत्ता मेघे यांचे दुसरे सुपुत्र समीर मेघे हे हिंगणा विधानसभेचे आमदार आहे.

परमबीर सिंगच्या भाजप संबंधामुळेच सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणही देखील अप्रत्यक्षरीत्या दडपल्याचा आरोप सुरु झाला आहे. एकाबाजूला सुशांत आत्महत्या प्रकरणावरून केंद्र सरकार आणि काही भाजप नेते उद्धव सरकारवर आरोप करीत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला सुशांतचे प्रकरण सीबीआयकडे जाऊन ८ महिने उलटले तरी सीबीआय याबाबत कोणताही खुलासा करत नाही हे त्यामागील कारण सांगितलं जातंय. त्यामुळे राज्यातील भाजप नेते सुशांतसिंग प्रकरण सीबीआयकडे जाऊन देखील जाब महाविकास आघाडी सरकारला विचारात आहेत आणि लोकांमध्ये संशय कल्लोळ निर्माण करत असल्याचं म्हटलं जातंय.

बंगळुरूमध्ये झाला होता शाही विवाह सोहळा;
परमबीर सिंग यांचा मुलगा रोहन सिंग आणि सागर मेघे यांची कन्या राधिका यांचा सन २०१७ मध्ये विवाह पार पडला. हा आलिशान आणि महागडा विवाह सोहळा बंगळुरूमध्ये झाला होता. त्यावेळी परमबीर सिंग ठाण्याचे पोलिस आयुक्त होते. महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांना मुंबईचे पोलिस आयुक्त करण्यात आले होते.