धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर संपन्न

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : येथील एमआयडीसी तडाळी येथील आरपी संजीव गोएंका ग्रुपच्या २ X ३०० मेगावॅटच्या उर्जा प्रकल्पात कार्यरत कर्मचारी त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि कंत्राटी कामगारांसाठी कोविड लसीकरण शिबिर दिनांक १७ आणि १८ जुलैला आयोजित करण्यात आले होते.

धारिवाल कंपनीच्या आवारात लसीकरण कोविड लसीकरण शिबिराचे उद्घाटन प्लांट हेड श्री भास्कर गांगुली यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. हे लसीकरण शिबिर नागपुर येथील प्रसिद्ध किंग्सवे रुग्णालय यांच्या सहकार्याने घेण्यात आले.

याप्रसंगी आपल्या उदघाटनीय भाषणात मनोगत व्यक्त करतांना प्लांट हेड श्री. भास्कर गांगुली यांनी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यासाठी जी मदत स्थानिक प्रशासनाने केली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले. ते पुढे म्हणाले की समूहाच्या धोरणानुसार धारिवाल हे कोविड -१९ च्या चालू महामारीपासून आपल्या कर्मचाऱ्यांना व कामगारांना संरक्षण देण्यासाठी वचनबद्ध आहे. ५०० कामगारांचे शिबीरात लसीकरण करण्यात आले. सर्व लाभार्थी कंपनीच्या पुढाकाराने खूश झाले आणि त्यासाठी व्यवस्थापनाचे आभार मानले.