वाघाच्या हल्यात शेतकरी ठार

चंद्रपूर : मूल वरून जवळच असलेल्या टेकाडी गावातील धाडू वडगू भोयर (65) हा शेतकरी वाघाच्या हल्ल्यात जागीच ठार झाला. ही घटना काल सायंकाळी साडेचार वाजताचे दरम्यान घडली.

धाडू भोयर आपले स्वतःचे बैल घेऊन चरायला जवळच्या जंगलात गेला होता. काल सायंकाळी साडे चार वाजता चे दरम्यान वाघाने त्याच्यावर हल्ला करून ठार केले. भांबावलेले बैल घरी परत आले, मात्र धाडू परत न आल्याने त्याचा शोधा शोध घेतला असता, आज पहाटे कक्ष क्रमांक 305 मध्ये त्याचा मृतदेह आढळून आला.
गावाचे नजीकच वाघाचे हल्ले होत असल्याने, शेतकरी-गावकरी भयभीत झाले असून वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे. घटनास्थळावर वन विभागाचे अधिकारी हजर झाले असून प्रेताचा पंचनामा केला जात आहे.