रेल्वेच्या भुयारी पुलाखाली पाणी येण्याचा प्रश्न मार्गी लागेल

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

चंद्रपृर : वेकोलिच्या कोळसा खाणीने वेढलेल्या भागात रेल्वेचा भुयारी मार्ग आहे. त्यातूनच पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे चिरादेवी, ढोरवासा, चारगाव, तेलवासा, पिपरी, कोची, घोनाड, मुरसा यासह १२ गावांचा संपर्क तुटत असतो. अनेकदा दोन ते दिवस या गावाला जाणारा रस्ता बंद असल्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हा लोकहितार्थ प्रश्न मार्गी लावण्यासाठी या भागातील आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आज रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वासुदेव ठाकरे, सरपंच सुनील मोरे, सदस्य ज्योती मोरे, सदस्य यासह रेल्वे अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
वर्धा नदीच्या तीरावर असलेले पिपरी गाव, हा पूरग्रस्त भाग म्हणून सर्वांच्या परिचित आहे. १९९४ रोजी आलेल्या महाकाय पुरामध्ये संपूर्ण गाव पुराच्या विळख्यात सापडले होते. आता देखील जास्त पाऊस आल्यामुळे रेल्वेच्या भुसारी पुलाखाली पाणी साठून राहते. त्यामुळे येथील नागरिकांना रहदारीकरिता मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आज आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मध्य रेल्वेचे सहाय्यक अभियंता नागदेवे यांच्याशी बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सूचना केल्या त्यामध्ये हायवे साईड रिटेनिग वॉल ची उंची १. ५ मीटर ने वाढविणे, त्यामुळे बाहेरील शेतीचे पाणी त्या पुलाखाली जाणार नाही, रिटेनिग वॉलच्या बाजूला असलेल्या नालीला डीप करणे, त्यामुळे पाणी बाजूच्या पुलाखाली जाणार नाही. चिरादेवी तथा तेलवासा साईड ला असलेल्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, तेलवासा सैद ला पुलाच्या जवळ पाणी काढण्यासाठी एक नाली बांधणे इत्यादि सूचना त्यांनी दिल्या.

ह्या सूचना लवकर मार्गी काढून हा प्रश्न कायमच्या सोडविण्याचे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले.