सुधीरभाऊ हे लोककल्याणासाठी सदैव झटणारे अजातशत्रू नेतृत्व : देवराव भोंगळे

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : आपल्या विविधांगी कामामुळे चंद्रपूर जिल्ह्याचा चेहरा-मोहरा बदलणारे, सर्वमान्य अजातशत्रू नेतृत्व आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस घुग्घुस येथील प्रयास सभागृहात सेवा दिवस म्हणून मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.भारत मातेच्या प्रतिमेसमोर द्विप प्रज्वलीत करून व पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य मोफत नेत्रचिकित्सा, चष्मे वाटप व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, मोफत शिधापत्रिका वाटप, निराधार योजना लाभ वाटप, व्यापाऱ्यांना फेसशिल्ड मास्क व सेनेटाईझर वाटप व जेष्ठ नागरिकांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

मनोगत व्यक्त करतांना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले आमदार सुधीरभाऊंचे नेतृत्व म्हणजे गोर गरिबांना मदत करणारे संवेदनशील नेतृत्व आहे. विकासपुरुष जननायक सुधीरभाऊंनी पाच वर्षात घुग्घुसच नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्याचा कायापालट केला. घुग्गुस शहरावर सुधीरभाऊचे अतिशय प्रेम राहिले आहे. घुग्घुस येथील ग्रामीण रुग्णालय सन 2018 ला सुधीरभाऊ पालकमंत्री असतांना मंजूर केले, प्रशासकीय मंजुरी दिली. शहरात दहा अत्याधुनिक बगीचे, नवीन पाणीपुरवठा योजना, सर्वत्र सिमेंट रस्त्याचे बांधकाम, कोरोना काळात विविधांगी मदत, कोविड लसीकरण केंद्राची सुरुवात, दोन RTPCR केंद्र सुरू केले, अनाथ मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलणे, मोफत ऑक्सिजन सेवा, रुग्णवाहिका भेट, रुग्णालयांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वाटप, धार्मिक स्थळांचा विकास, गांधी चौकाचे सौंदर्यीकरण, नवीन बस स्थानक, गावात सर्वत्र हायमास्ट लाईट एलईडी लाईट, दहा आरो मशीन असे अनेक विकासकामे सुधीरभाऊच्या माध्यमातून घुगुस मध्ये पार पडलीत. भाऊंच्या नावाने मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवाकेंद्र गोरगरिबांची अहोरात्र मदत करत आहे. भाऊंना दीर्घायुष्य लाभो हीच वाढदिवसानिमित्त शुभकामना.

प्रास्ताविकपर भाषणात बोलतांना भाजपा युवामोर्चा जिल्हामहामंत्री विवेक बोढे म्हणाले आ. सुधीरभाऊंचा वाढदिवस नेहमी सेवादिवस म्हणून साजरा करतो. घुग्घुसमध्ये पहिल्यांदा जेष्ठ नागरिक संघाची स्थापना घुग्घुस नगरात होत आहे. आज वयोवृद्ध आई वडिलांना त्यांची मुले पोसत नाही, अश्या वेळेस कोणतीही मदत लागल्यास सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन केले.

याप्रसंगी जेष्ठ नागरिकांना काठी, फेसशिल्ड, मास्क वाटप करण्यात आले. व्यापारी बंधूना फेसशिल्ड, मास्क, सेनेटाईझर वाटप करण्यात आले. लाभार्थ्यांना मोफत शिधापत्रिका वाटप करण्यात आली. अनाथ गरीब महिलांना लाभार्थ्यांना निराधार योजनेचा लाभ देण्यात आला.

नेत्रचिकित्सा शिबिरात नागपूर येथील तज्ञ डॉक्टरांमार्फत 812 नागरिकांच्या डोळ्याची तपासणी करण्यात आली. 521 रुग्णांना मोफत चष्माचे वितरण करण्यात येणार आहे तसेच 126 रुग्णांची मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येईल.

यावेळी मंचावर भाजपा युवामोर्चा जिल्हामहामंत्री विवेक बोढे, माजी जि.प. सभापती सौ. नितुताई चौधरी, नकोडा सरपंच कीरण बांदूरकर, प.स. माजी सभापती निरीक्षण तांड्रा, माजी जिप सदस्य चिन्नाजी नलभोगा, संजय तिवारी, माजी सरपंच संतोष नुने, प्रकाश बोबडे, सिनू इसारप, हेमंत उरकुडे, विनोद चौधरी, संजय भोंगळे, सुरेंद्र जोगी, सामाजिक कार्यकर्त्या सरस्वता पाटील, घुग्घुस जेष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष मधुकर मालेकर, कुसुमताई सातपुते, नंदा कांबळे, सुचिता लुटे, सुनीता पाटील, नजमा कुरेशी, बबलू सातपुते, प्रवीण सोदारी, दिलीप कांबळे, पूनम शंकर, पांडुरंग काळे, अजय आमटे, भारत साळवे, प्रयास बँकेच्या अध्यक्षा किरण बोढे उपस्थित होते. संचालन साजन गोहणे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल थेरे, गुड्डू तिवारी, राजू चटकी, संकेत बोढे, धनराज पारखी, मुकेश कामतवार, नितीन काळे, ईश्वर लेंडे, अजय लेंडे, सुनंदा लिहीतकर, सोनू बहादे, शीतल कामतवार, प्रिया नागभीडकर, खुशबू मेश्राम, पायल मांदाडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास मोठया संख्येत नागरिक उपस्थित होते.