चंद्रपूर : तालुक्यातील प्रमुख औद्योगिक शहर असलेल्या घुग्घुस परिसरातील पाच ग्रामपंचायत पैकी तीन ग्रामपंचायतवर काँग्रेसची एकहाती सत्ता मिळविण्यात यश आलेले आहे.
हा परिसर भाजपाचा गड होता भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व माजी सभापती ब्रीजभूषण पाझारे यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या निवडणूका घेण्यात आल्या यात ब्रिजभूषण पाझारे यांना नकोडा वाचविण्यात यश आले आहे मात्र लगतच्या उसगावात भाजपचा सुपडाच साफ झाला आहे. महातारदेवी ग्रामपंचायत हे भाजप ग्रामीण अध्यक्षांच्या कट्टर कार्यकर्त्यांचा गड ही यावेळीस ढासडला आहे. येथे नऊ सदस्यांपैकी काँग्रेसचे सात उमेदवार निवडून आल्यामुळे भाजपाला सत्ता गमवली.
उसगाव येथे सौ. सविता धनंजय ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नऊ पैकी नऊ उमेदवार हे काँग्रेसचेच निवडून आले ह्या ठिकाणी भाजप खाता ही उघडू शकली नाही.
तसेच मागील 20 वर्षापासून भाजपची सत्ता असलेल्या वढा ग्रामपंचायत मध्ये ही काँग्रेस उमेदवार हे बहुमताने निवडून आल्याने भाजपाला सत्ता गमवावी लागली, शेंणगाव येथे संभाजी ब्रिगेडचे चार तर काँग्रेसचे तीन सदस्य निवडून आले आहेत.
विशेष म्हणजे उसगाव, वढा हे नकोडा जिल्हापरिषदेच्या अंतर्गत येतात व याच भाजपचे माजी सभापती यांचे हे क्षेत्र आहे. निवडून आलेल्या सदस्यांचा चंद्रपूर विश्रामगृहात पालकमंत्री विजय वड्डेटीवार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, घुग्घुस अध्यक्ष राजूरेड्डी यांनी पुष्पहार घालून सत्कार केला