व्यायाम करणे जीवावर बेतले
ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : चिचगाव डोर्ली मार्गावर मॉर्निंग वॉक करीत असलेल्या वांद्रा येथील नैतिक संतोष कुथे( वय 10 वर्ष) या बालकावर बिबट्याने झडप घालून जागीच ठार करून झुडपात ओढत नेल्याची घटना आज दिनांक 1 ऑक्टोंबर ला पहाटे साडेपाच वाजता च्या सुमारास ब्रह्मपुरी उत्तर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या चिचगाव कक्ष क्रमांक 1010 मध्ये घडली.
परिसरात सध्या पहाटेच्या सुमारास मार्निंग वाक करिता शाळकरी मुले, तरुण मंडळी गावाबाहेर पडताना दिसत आहेत वांद्रा येथील नैतिक संतोष कुथे हा मार्निंग वाक याकरिता आपल्या सवंगड्यांसोबत सकाळी पाच वाजता घरून गेला होता डोर्लि बस स्टॅन्ड ते चिचगाव या रस्त्यावर धावत असताना नैतिक च्या पायातील चप्पल तुटली चप्पल तुटल्याने नैतिक खाली वाकला तेवढ्यात रस्त्याच्या कडेला झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने नैतिक वर झडप घेऊन जंगलात ओढत नेले सोबत असलेल्या मुलांनी आरडाओरड केली मागे धावले तोपर्यंत नैतिक गतप्राण झालेला होता घटनेची माहिती होताच ब्रह्मपुरी पोलिस, वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे नेण्यात आले. वांद्रा, चिचगाव,आवळगाव परिसरात यापूर्वीही वाघाने अनेकांचे बळी घेतले आहेत वाघाची दहशत ही कायमचीच या परिसरात आहे.
या आधी सुद्धा सावली तालुक्यात 9 सप्टेंबरला व्यायाम करायला गेलेल्या 12 वर्षीय संस्कार बुरले वर बिबट्याने हल्ला करून ठार केले होते.