सावली (चंद्ररपूर) : काँग्रेसचे मूल तालुक्यातील नेते संजय मारकवार यांचा काल रात्री 7/30 वाजताच्या दरम्यान खेडी – गोंडपिपरी मार्गावर अपघात झाला. त्यात संजय मारकवार यांना असलेल्या जखमा वरून घात आहे की अपघात यावर साशंकता निर्माण झाल्याने चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे सावली पोलिस स्टेशन येथे करण्यात आली.
संजय मारकवार यांच्या अंगावर असलेले सुमारे 15 तोळे सोने व पैशाचे पाकीट नसल्यामुळे तसेच अंगावरील जखमांमुळे घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवेदन देण्यासाठी संदीप गड्डमवार, संतोष रावत, विनोद अहिरकर, राजू मारकवार, रवींद्र शिंदे, घनश्याम येनुरकर, राकेश रत्नावार, प्रकाश मारकवार, सुमित उन्हाळकार, नरेश हरले, चंदू मार्गोनवार,विलास यासलवार, विजय मुत्यालवार, विजय कोरेवार नितीन दुवावार. मनोज चोधरी. प्रफुल वाळके छत्रपती गेडाम प्रीतम गेडाम. आदी मंडळी उपस्थित होती. या अपघात की घातपात प्रकरणात त्वरित कारवाई न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला.
दरम्यान सावलीच्या ठाणेदार कुमार सिंग राठोड यांनी येत्या 24 तासात कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यामुळे आंदोलनाची भूमिका तूर्तास मागे घेण्यात आली.