घुग्घुस (चंद्रपूर) : जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत असलेल्या घुग्घुस ग्रामपंचायतला नगरपरिषदचे डोहाळे लागले असतांना 15 जानेवारी रोजी ग्रामपंचायतची निवडणूक होत आहेत.
एकूण 17 सदस्य असलेल्या ग्रामपंचायत मध्ये मागील पंचवार्षिक सत्रात जनतेने काँग्रेस समर्थीत महिला सरपंच व सदस्य यांना सत्ता दिली.
मात्र काँग्रेस पक्षाचे बहुतांश सदस्य ज्यात उपसरपंचचा ही समावेश होता त्यांना भाजपने साम – दाम – दंड – भेद उक्तीप्रमाणे भाजप मध्ये शामिल करून घेतले आहे.
एकंदरीत घुग्घुस ग्रामपंचायत मध्ये काँग्रेसचाच वर्चस्व जास्त असतांना देखील काँग्रेसचे सदस्य घेऊन गेल्या पंचवार्षिक सत्रात भाजपने ग्रामपंचायतवर ताबा मिळवला होता. परत आता तगड्या सदस्यांची जमवाजमव भाजपने शुरू केलेली आहे.
काल 12 डिसेंम्बर रोजी शिवसेनेचे नेते व माजी ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर चिकणकार यांनी भाजप प्रवेश घेतला आहे. वेकोली परिसरात भाजप सशक्त स्तिथीत दिसत आहे.
मात्र भाजप जिल्हाध्यक्ष व वेकोली परिसरातील माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्यातील गटबाजी सर्वश्रुतच आहे.
यामुळे अन्य पक्षातील तगडे उमेदवाराना भाजप मध्ये घेणे शुरू आहे.
मात्र वस्ती परिसरात तिची ढिली असलेली पकड मजबूत करण्याचा भाजपच्या या डावपेचाला महाविकास आघाडी कशी टक्कर देते हे येणारा वेळच सांगेल सध्या तरी काँग्रेसचे दोन्ही गट हे आप – आपले गटबाजी सोडून एकत्रीत आल्याचे चित्र असल्याने काँग्रेस समर्थकांत ही उत्साह आहे.