ब्रम्हपुरी (चंद्रपूर) : पूर्व विदर्भातील पुरग्रस्तांना न्याय न दिल्यांने, शेतकऱ्यांना हायकोर्टात घेतली धाव पुरग्रस्तांना न्याय देवू न शकणारे मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आम आदमी पार्टीच्या नेत्या ऍड. पारोमिता गोस्वामी यांनी केली. रविवारी ब्रम्हपुरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली.
कोकणातील चक्रिवादळ ग्रस्तांना भरभरून मदत करणारे मदत आणि पुर्नवसन विभाग पूर्व विदर्भातील पुरग्रस्तांप्रति भेदभाव करतात. कोकणातील चक्रिवादळग्रस्तांना 1.50 लाख रूपये तर, पूर्व विदर्भातील पुरग्रस्तांना केवळ 95 हजार रूपये दिले जात आहे. कोकणातील चक्रिवादळग्रस्ताचे तीन महिण्याचे वीज बिल माफ करण्यात आले, मात्र पुरग्रस्तांना भरमसाठ वीज बिले पाठविण्यात येत आहे. शेतीची नुकसान भरपायी 30 सप्टेंबर पर्यंत 18 हजार हेक्टर प्रमाणे देण्याचे मंत्री वडेट्टीवार यांनी जाहीर केले होते, मात्र अजूनही ही मदत मिळाली नसून, आता ती 13,600 रूपये हेक्टर देण्यांचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
आपल्याच मतदार संघातील मतदारांसोबत मदत देण्यात पालकमंत्री वडेट्टीवार हे दुजाभाव करीत असल्यांने, ते पुरग्रस्तांना न्याय देत नसल्यांचे दिसून आल्यांने, शेतकऱ्यांना अखेर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. हा पालकमंत्री यांचे अपयश असून, त्यांनी याची नैतिक जबाबदारी स्विकारून, मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी ऍड. गोस्वामी यांनी केली आहे. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचे पाश्वभूमीवर ‘आपण शेतकऱ्यांसोबत आहोत’ असे सांगणारे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, हे आपल्याच मतदार संघातील शेतकऱ्यांना न्याय का देत नाहीत? असा सवालही ऍड. गोस्वामी यांनी केला आहे.
रविवारी पत्रकार परिषदेला उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे पुरग्रस्त शेतकरी, माणिक चौधरी, मनोहर नाकतोडे यांचेसह सुभाष नाकतोडे, हिरामण मुळे, शिवशंकर ढोरे, इश्वर बेदरे उपस्थित होते.