चंद्रपूर : तृतीयपंथीयांना समाजात सन्मानाने जगता यावे, यासाठी त्यांना पोलीस विभागात व इतर विभागात दोन टक्के आरक्षण देऊन नोकरीत स्थान द्यावे, अशी मागणी आमदार प्रतीभा धानोरकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
तृतीयपंथीयांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. त्यांना रोजगाराचे पुरेसे साधन उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये कोशल्य असूनही तृतीयपंथीय जगण्यासाठी रेल्वेस्थानक, बसस्थानक परिसरात लोकांना आर्थिक मदत मागत असतात. अनेकांकडून त्यांना हिन दर्जाची वागणूक दिली जाते. त्यामुळे त्यांना समाजात स्थान मिळवूण देण्यासाठी तसेच त्यांचे आर्थिक स्त्रोत वाढावे, नोकरभरतीत त्यांचे प्रमाण वाढावे, यासाठी पोलीस विभाग व इतर विभागात दोन टक्क आरक्षण देवून शासकीय नोकरीत सहभागी करावे, अशी मागणी आमदार प्रतीभा धानोरकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. आता अनेक तृतीयपंथी शैक्षणिक प्रवाहात येत असून, सुशिक्षित होत आहेत. नोकरीत आरक्षण मिळाल्यास रोजगाराची हमी मिळेल आणि उच्च घेण्यास प्रवृत्त होतील, असेही आमदार धानोरकर यांनी म्हटले आहे.