चंद्रपूर | मनपा अधिकारी व कर्मचारी पोहचले सायकलने कार्यालयात

0
21

माझी वसुंधरा अभियानांतर्गत सायकल मोहीम

चंद्रपूर : आयुक्त राजेश मोहिते यांच्या पुढाकारात चंद्रपूर महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांनी आज सायकलने कार्यालय गाठले. राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाच्या माझी वसुंधरा 2021 कार्यक्रम अंतर्गत प्रदुषण कमी करण्याच्या दृष्टीने अनेक महत्वपूर्ण पाऊले उचलण्यात येत आहे, त्याचाच एक भाग म्हणुन शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी आठवड्यातून एक दिवस आपली दुचाकी व चार चाकी वाहनांचा वापर न करता सायकलने कार्यालयात येणे अनिवार्य केलेले आहे, त्यामुळे सर्व मनपा अधिकारी कर्मचारी सकाळी १० च्या सुमारास येथे प्रियदर्शनी चौक येथे एकत्र आले व तेथून सायकलने कार्यालयात येऊन मोहीमेची अंमलबजावणी केली.

माझी वसुंधरा अभियान दि २ ऑक्टोबर २०२० ते दिनांक ३१ मार्च २०२१ या कालावधीत राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातुन लागु केले असुन प्रत्येकाच्या जिवनाशी निगमित, निर्सगाशी संबंधीत पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वावर आधारीत शाश्वत निसर्गपूरक जीवनपध्दती अवलंबिण्याकरीता हे अभियान सुरु केले असुन या अभियान कालावधीत पंचतत्वाला व मानवी जीवनाला सहकार्य होण्याच्या हेतुने दर शुक्रवारी प्रत्येक अधिकारी/कर्मचारी यांनी सायकलने (यंत्र विरहित) कार्यालयात यावे असा निर्णय चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त श्री. राजेश मोहिते यांनी घेतला होता.

प्रत्येक शुक्रवारला कोणत्याही अधिकारी/कर्मचारी यांनी कोणतेही वाहन आणु नये व आणल्यास त्यांनी मनपा आवारात प्रवेश दिल्या जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. सदर बाब वैयक्‍तीक आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक असुन प्रत्येकाने या अभियान सक्रिय सहभाग घेण्याचे व आपल्या अधिनस्त अधिकारी/ कर्मचारीसह आपल्या सभोवतालच्या संबंधीत किमान ०५ लोकांना महत्व पटवुन या अभियानाची व्याप्ती पाठविण्यास सहकार्य करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले असून त्यांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

याप्रसंगी आयुक्त श्री राजेश मोहिते, उपायुक्त श्री विशाल वाघ, सहा आयुक्त धनंजय सरनाईक, शीतल वाकडे, विद्या पाटील, शहर अभियंता श्री महेश बारई, लेखाधिकारी श्री. संतोष कंधेवार,अंतर्गत लेखा परीक्षक श्री मनोज गोस्वामी, सर्व अभियंता ,कर्मचारी स्वच्छता निरीक्षक यांनी सायकल अभियानात सहभाग नोंदविला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here