ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन
घुग्घुस : राज्यातील सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, त्याची आदर्श आचारसंहिता लागू असतांना भाजप युवामोर्चा जिल्हामहामंत्री तथा शहर अध्यक्ष विवेक बोढे हे, माजी प्रभारी सरपंच संतोष नूने यांच्या काळातील शौचालय, तलाव रस्त्याचे आधुनिकरण, नाली बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी उभे होऊन पं.स.चे अभियंता भास्कर येनुरकर , कंत्राटदार झाडे यांच्या समक्ष कामाची पाहणी केली. आढावा घेत असल्याचे व्हिडीओ फोटोसेशन करून बातम्या व समाज माध्यमातून प्रकाशित करीत आहे. आचारसंहितेच्या काळात शासकीय अधिकारी नसतांना राजकीय पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विकास कामाचा आढावा घेणे हे आचारसंहितेचे सर्रास उल्लंघन केले आहे.
यासंदर्भात अभियंता येनुरकर यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी उडवा – उडवीचे उत्तर देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.
ग्रामपंचायत सचिव राजेंद्र भानोसे
यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी हे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे स्पष्ट केले. आचारसंहितेचे उल्लंघन हे भारतीय जनता पक्षाचे नेहमीचेच झाले असून यापूर्वी ही पदवीधर शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक वेळेस ही आचारसंहितेचे उल्लंघन करण्यात आले. तसेच ग्रामपंचायतची आचारसंहिता लागलेली असून ही राजकीय पक्षाचे फ्लेक्स लागलेले आहेतच. मात्र ग्रामपंचायत प्रशासन डोळे बंद करून मूग गिळून गप्प बसलेले आहेत. यामुळे घुग्घुस परिसरात आश्चर्य व्यक्त केल्या जात आहेत.